मंगळवेढा ब्रेकिंग :- मंगळवेढा तालुक्यातील बोराळे येथील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह..... - Divyaprabhat News

Breaking News

Wednesday, July 8, 2020

मंगळवेढा ब्रेकिंग :- मंगळवेढा तालुक्यातील बोराळे येथील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह.....


दिव्य न्युज नेटवर्क
           मंगळवेढा तालुक्यातील बोराळ  येथील  एक व्यक्तीचा आज दिनांक 08/07/2020 रोजी कोरोना चाचणी अहवाल  पॉझिटिव्ह आला आहे.याबाबत अधिक माहीती अशी की,सदर व्यक्ती बोराळे ता.मंगळवेढा येथील स्थानिक रहीवासी असुन शेतकरी आहे त्याचे कुटुंबात एकुण 5 व्यक्ती आहेत.सदर व्यक्ती दि.02/07/2020 रोजी बॅक कामानिमीत्त सोलापूरला गेली होती.
                 त्याच दिवशी बॅक कामकाज करुन  मौजे बोराळे येथे परत आली व सोलापूर मध्ये सदर व्यक्ती त्याच्या मित्रास भेटली असुन मित्र  कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्याचे संपर्कामुळे बोराळे येथील व्यक्तीस दिनांक 06/07/2020 रोजी त्रास जाणवु लागल्याने  नवनीत तोष्णीवाल हॉस्पीटल, सोलापूर येथे तपासणी कामी गेले होते,ते आज पर्यंत ते तिथेच असून त्यांची कोरोना चाचणी करणेत आली व त्यांचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे.
   
 

बोराळे ता.मंगळवेढा हे गाव कंटेनमेंट झोन जाहीर करणेचे कामकाज प्रशासनाकडुन सुरु करणेत आलेले आहे.सदर व्यक्तीचे संपर्कात आलेले high risk contacts व low risk contacts शोधणेचे कामकाज चालु असून प्रशासनाने आवश्यक ती काळजी घेतली आहे व आवश्यकते नुसार पुढील कार्यवाहीसाठी प्रशासन सज्ज आहे. त्यामुळे नागरीकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडु नये. घराबाहेर जात असल्यास मास्क वापरणे सक्तीचे आहे.
प्रशासनाने आतापर्यंत दिलेल्या सुचनांचे तंतोतत पालन करावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी:-उदयसिंह भोसले यानी केले ...

Pages