दिव्य प्रभात न्यूज इफेक्ट;अखेर पाटकळ येथील अवैद्य ताडी विक्रेत्यावर कारवाई ... . - Divyaprabhat News

Breaking News

Tuesday, July 7, 2020

दिव्य प्रभात न्यूज इफेक्ट;अखेर पाटकळ येथील अवैद्य ताडी विक्रेत्यावर कारवाई ... .दिव्य न्युज नेटवर्क 

             दिनांक 01 जुलै रोजी दिव्य प्रभात न्युजमध्ये पाटकळ येथे अवैधरित्या ताडी विक्री सुरू अशी दिव्य प्रभात न्यूज मध्ये बातमी प्रकाशित होताच राज्य उत्पादन शुल्कच्या संबधित अधिकारी वर्गानी मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ येथे गोपनीयरीत्या येऊन अवैधरित्या विक्री करणाऱ्या वर कारवाई केली.या अचानक झालेल्या दिव्य प्रभातच्या बातमीमुळे अवैध धंदे करणाऱ्या लोकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
         
 यापुढेही अवैद्य धंदे करणा-यावर अशीच कारवाई चालू ठेवाव्यात अन्यथा पुढे पाठ मागे सपाट अशी अवस्था होऊ नये अशी मागणी पाटखळसहीत पंचक्रोशीतील गावांमध्ये दिसून येऊ नये अशी या भागातील महिलांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
       
             या अवैद्यरीत्या चालणा-या ताडीमुळे अनेकांचे संसार धुळीला मिळाले आहेत.तर अनेक युवक या व्यसनाच्या आहारी गेले आहेत. त्यामुळे दिव्य प्रभात न्युजने सातत्याने पाठपुरावा केला व अवैद्यरीत्या चालणा-या ताडीविक्रेत्यावर कारवाई करण्यास भाग पाडले.त्यामुळे दिव्य प्रभातचे पाटखळसहीत पंचक्रोशीतील युवक,महिला व ग्रामस्थांनी आभार मानले आहे.

Pages