धक्कादायक:-करोना बळींची संख्या सहा लाखांच्या पुढे;एक कोटी ४४ लाख २५ हजार ८६५ करोनाबाधित ... - Divyaprabhat News

Breaking News

Saturday, July 18, 2020

धक्कादायक:-करोना बळींची संख्या सहा लाखांच्या पुढे;एक कोटी ४४ लाख २५ हजार ८६५ करोनाबाधित ...



दिव्य न्युज नेटवर्क
       
            करोना विषाणू या महामारीचा विळाखा दिवसागणिक आधिक घट्ट होत चालला आहे. जगात दररोज लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगात आतापर्यंत एक कोटी ४४ लाख २५ हजार ८६५ करोनाबाधित रुग्ण झाले आहेत. तर करोना बळींची संख्या सहा लाख चार हजार ९१७ इतकी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत ८६ लाख १२ हजार जणांनी करोनावर मात केली आहे. ५२ लाख रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
         
 अमेरिका, ब्राझील आणि भारताला करोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. अमेरिकेत आतापर्यंत ३८ लाख ३३ हजार २७१ जणांना करोना झाला आहे. यापैकी एक लाख ४२ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराची परिस्थिती सर्वात भयानक आहे. अमेरिकासारख्या देशात करोना विषाणूमुळे झालेल्या नुकासानामुळे अनेक देशात भितीचं वातावरण आहे. अमेरिका आणि ब्राझीलमध्ये दररोज ५० हजारांपेक्षा जास्त करोनाबाधित रुग्ण आढळत आहेत.
          .  ब्राझीलमध्येही करोनाची भयावह परिस्थिती असून आतापर्यंत २० लाख ७५ हजार जणांना करोना झाला आहे. तर ७८ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलपाठोपाठ भारताला करोनाचा विळाखा बसला आहे. भारतामध्ये आतापर्यंत जवळपास ११ लाख जणांना करोना झाला असून २७ हजार जणांना करोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या २० दिवसांत भारतात पाच लाख करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. देशात सध्या दरदिवशी ३० हजारांपेक्षा जास्त करोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत.
            मुंबई, पुणे आणि दिल्लीसारख्या शहरात करोनाचा विस्तार वाढत असल्यामुळे भारतीय चिंतेत आहेत. रशिया, दक्षिण आफ्रिका, पेरु आणि मॅक्सिकोसारख्या देशात लाखांत रुग्णसंख्या आहे.


Pages