मंगळवेढा ब्रेकिंग:- मंगळवेढा सबजेलमधील 28 कैद्यांसह एक पोलीस व दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण... - Divyaprabhat News

Breaking News

Saturday, July 18, 2020

मंगळवेढा ब्रेकिंग:- मंगळवेढा सबजेलमधील 28 कैद्यांसह एक पोलीस व दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण...दिव्य न्युज नेटवर्क
             मंगळवेढा तालुक्‍यात कैद्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असले तरी मंगळवेढा येथील सबजेल 40 मधील 28 कैद्यांचे अहवाल रॅपिड अँटिजेन चाचणीत पॉझिटिव्ह आले आहेत तर कैद्यांबरोबरच एक पोलिस अधिकारी, दोन सुरक्षारक्षक व एका डबेवालासह दिवसभरात 34 रुग्ण आढळून आले.मंगळवेढा तालुक्‍यात कैद्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असले तरी, प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतल्याचे सांगण्यात आले आहे.
   
सबजेल मधील 12 कैद्यांची चाचणी निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना तात्पुरत्या स्वरूपात नवीन तहसील कार्यालयातील जेलमध्ये स्थलांतर करण्यात आले आहे.आवश्‍यक त्या उपाययोजना करण्याच्या दृष्टीने प्रशासन सज्ज असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली आहे.

Pages