तहसील कार्यालयातून पळून गेलेले वाळूचे वाहन व आरोपी पकडण्यात पोलिसांची होतेय टाळाटाळ;पाेलीस महानिरिक्षकांनी लक्ष घालन्याची हाेतेय मागणी.... - Divyaprabhat News

Breaking News

Monday, July 20, 2020

तहसील कार्यालयातून पळून गेलेले वाळूचे वाहन व आरोपी पकडण्यात पोलिसांची होतेय टाळाटाळ;पाेलीस महानिरिक्षकांनी लक्ष घालन्याची हाेतेय मागणी....



  मंगळवेढा /प्रतिनिधी 
           मंगळवेढा तहसील कार्यालयाच्या आवारातून वाळूचा टेंपो पळवून नेण्याच्या घटनेला पंधरा दिवसाचा कालावधी उलटला असतानाही अदयापही वाहन मालक तथा आरोपी सर्वेश्‍वर दामू शेजाळ (रा.गोणेवाडी) याला पकडण्यात पोलिसांना अपयश आले आहे.दरम्यान,आरोपीचा भाऊ पोलिस खात्यातील असल्याने आरोपीस पकडण्यास टाळाटाळ होत असल्याची चर्चा होत आहे.दरम्यान,कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक डॉ.सुहास वारके यांनीच या कामी लक्ष घालून या घटनेचा पर्दाफाश करावा अशी मागणी जोर धरीत आहे.
         
या घटनेची हकिकत अशी,दि.4 जुलै रोजी पहाटे 4.00 वा. मौजे बावची गावालगत असलेल्या सरकारी ओढयातून बेकायदा वाळू उपसा होत असल्याची माहिती मंडल अधिकारी एस.एन.घुगे यांना मिळताच ते पथकासह ओढयाकडे जात असताना टेंपो नं.एम एच 13 सी.यु.4945 या मधून वाळू घेवून येत असल्याने त्यास हात करून थांबविले.व  हा वाळूचा टेंपो जप्त करून तो मंगळवेढा तहसील कार्यालयाच्या आवारात आणून लावला होता. सकाळी 7.00 ते 9.00 च्या दरम्यान आरोपी सर्वेश्‍वर दामू शेजाळ याने शासनाच्या रखवालीतून लबाडीने चोरून नेला असल्याची फिर्याद तलाठी बदन राठोड यानी दिली होती. हा टेंपो पळवून नेवून पंधरा दिवसाचा कालावधी लोटला याचा तपास पोलिस कर्मचारी तुकाराम कोळी हे करीत आहेत.
           शासनाची मालमत्ता चोरीला जावूनही तपासात दिरंगाई होत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.आरोपी हा मंगळवेढा शहरातून उथळ माथ्याने फिरताना नागरिकांना दिसतोय मात्र पोलिसांनाच का दिसत नाही असा सवालही विचारून तपासावर शंका व्यक्त केली जात आहे. दबक्या आवाजात आरोपीचा भाऊ पोलिस खात्यामध्ये असल्यामुळे शासकीय मालमत्तेची चोरी होवूनही तपास करण्यात तपासिक अंमलदार दिरंगाई करीत असल्यची खमंग चर्चा शहरातून सुरु आहे. पळवून नेलेला टेंपो जवळा परिसरात आरोपीच्या नातेवाईकाकडे असल्याची माहिती  त्या तपासिक अंमलदाराला माहिती असतानाही ते वहान अदयापही जप्त केले नाही.एकंदरीत या घटनेत आरोपीला पकडणे व वाहन जप्त करणेकामी गांभिर्यपूर्वक टाळाटाळ केली जात असल्याचे उघड होत आहे.

टेंपो पळून जावून पंधरा दिवसाचा कालावधी उलटला आरोपी हा मंगळवेढयात उथळ माथ्याने फिरत आहे. आरोपीचा भाऊ पोलिस खात्यात असल्यामुळे तपास करणारा पोलिस आरोपीस पकडण्यास विलंब करीत आहे.
- सत्यवान घुगे,मंडल अधिकारी हुलजंती मंडल




Pages