पुणे विभाग पदवीधरसाठी जोरदार मोर्चेबांधणी..... - Divyaprabhat News

Breaking News

Tuesday, June 9, 2020

पुणे विभाग पदवीधरसाठी जोरदार मोर्चेबांधणी.....
दिव्य न्यूज नेटवर्क

           भाजप व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातुन पुणे विभाग पदवीधर मतदार नोंदणीसाठी आवाहन केले आहे.इंटरनेटच्या माध्यमातुन मतदार नोंदणी केली जात आहे.धकाधकीचे जीवन,राजकारणात रस नसल्याने पदवीधर मतदार नोंदणीसाठी फारसे उत्सुक नसतात.पदवी धारकांची संख्या मोठी असली तरी नोंदणी कमी प्रमाणात होते.
 
 असा आजवरचा अनुभव आहे.यंदा पदविका धारकांना मतदार नोंदणीची मुभा दिली आहे.पुणे विभाग पदवीधर मतदार संघावर जनता दलाचा अपवाद वगळता भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व आहे.मागील निवडणुकीत राष्ट्रवादीने जोरदार लढत दिली असली तरी राष्ट्रवादीच्या मत विभाजनाचा फायदा भाजपाला झाला.सध्या राष्ट्रवादीच्या सोबत शिवसेना,काँग्रेस असल्याने याचा फायदा राष्ट्रवादीला होऊ शकतो.भाजपाचे कै.नारायणराव वैद्य,विद्यमान केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सलग दोन वेळा,जनता दलाचे प्रा.शरद पाटील,भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी यांनी सलग दोन वेळा या पदवीधर मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
                  मागील निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांनी सारंग पाटील यांचा 2,380 मतांनी पराभव केला होता.भाजपाच्या चंद्रकांत पाटील यांना 61,453 तर राष्ट्रवादीच्या सारंग पाटील यांना 59,073 मते पडली होती.राष्ट्रवादीचे बंडखोर अरुण लाड यांना 37,189 मते पडली.भाजपा आपला गड कायम राखण्यासाठी झटत आहे.राष्ट्रवादी गड ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करत आहे.एकास एक लढत झाल्यास शिवसेना,काँग्रेसची सोबत असल्याने राष्ट्रवादीचे पारडे जड आहे.भाजप आपला गड ताब्यात ठेवण्यासाठी निकराचे प्रयत्न करत आहे.कोरोनाच्या पार्श्वभुमीवर निवडणुक जाहीर झाली नसली तरीही पुणे विभाग पदवीधरसाठी भाजप व राष्ट्रवादीने जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे.
               पुणे,सांगली,सातारा,कोल्हापूर,सोलापूर या पाच जिल्ह्याचा हा मतदार संघ आहे.साधारणपणे 76 विधानसभा मतदार संघाचा यामध्ये समावेश होतो.

Pages