ब्रम्हपुरीत बेकायदा वाळू उपसा करणार्‍या मोटर सायकली महसूल पथकाने केल्या जप्त..... - Divyaprabhat News

Breaking News

Tuesday, June 9, 2020

ब्रम्हपुरीत बेकायदा वाळू उपसा करणार्‍या मोटर सायकली महसूल पथकाने केल्या जप्त.....



पोलिसांनी चोप दिल्याने वाळू उपसा करणार्‍यांचे धाबे दणाणले...
 

मंगळवेढा/प्रतिनिधी
       
              ब्रम्हपुरी येथील भिमा नदीपात्रातून मोटर सायकलव्दारे अवैधरित्या वाळू उपसा होत असल्याची माहिती पोलिस प्रशासनास मिळताच पोलिसांनी छापा टाकला. यावेळी अनेक मोटर सायकलस्वार पळून गेले.मात्र त्यापैकी दोघेजणच हाती लागले असून पुढील कारवाईसाठी त्या दोन मोटर सायकली महसूल च्या ताब्यात देण्यात आल्या. दरम्यान, वाळू चोरी करणार्‍या मोटर सायकलस्वारांना पोलिसांनी चांगलाच चोप दिल्याने  अवैध वाळू  उपसा करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे.
सध्या भिमा नदीचे पात्र पाण्याअभावी कोरडे ठणठणीत पडले आहे. पाणी नसल्यामुळे वाळू चोरीला ऊत आला आहे.       
       
गावातील मोटर सायकलस्वार नदीपात्रातून वाळू उपसा करून त्याचा साठा केला जात असे. व ही वाळू विक्री करून आपले उखळ पांढरे करण्याचा प्रकार मागील आठवडयात दिवस-रात्र बिनधास्तपणे सुरु होता. वाळू उपसा सुरु असल्याची माहिती पोलिस प्रशासन व महसूल विभागाला मिळाल्यानंतर परवा पोलिसांनी भर दुपारी भिमा नदीचे पात्र गाठून वाळू उपसा करणार्‍या मोटर सायकली जप्त केल्या. पोलिसांसोबत आलेल्या दोन तलाठयांनी या मोटर सायकली ताब्यात घेवून तहसील कार्यालय आवारात आणून लावल्या आहेत. गौण खनिज विभागाकडून  वाळू उपसा करणार्‍या या मोटर सायकलवर कारवाईची प्रक्रिया  सुरु असल्याचे सांगण्यात आले.
           दरम्यान, वाळू उपसा करणार्‍यामध्ये मोठया संख्येने मोटर सायकली होत्या. यामध्ये टिपर व ट्रॅक्टरने  वाळू उपसा करणारे चालकही सामील होते मात्र त्यांना वाळू उपसा करण्याचा  पुर्वीचा  अनुभव असल्याने ते सहीसलामत पळून गेले. जे नव्याने वाळू उपसा करावयास गेले ते मात्र कारवाई पथकाच्या जाळयात अडकल्याची खमंग चर्चा ब्रम्हपुरी परिसरात होत आहे.पळून गेलेल्या मोटर सायकलस्वारांचा शोध पोलिस घेत आहेत.

'त्या दोन माेटरसायकल वाळू चोरांना शिक्षा म्हणून त्याच्याकडून तहसील कार्यालयाचा पूर्ण परिसर स्वच्छ करून घेण्यात आल्यानंतर त्यांना साेडून देन्यात आले आहे.त्यांच्या टू व्हिलर गाड्या जप्त करून घेण्यात आल्या आहेत. सदरील वाळूच्या ठिकाचे पंचनामे करून त्याच्यावर पुढील दंडात्मक कारवाई करण्यात ऐनार आहे
                            मंगळवेढा तहसीलदार स्वप्निल रावडे



Pages