रेल्वेच्या 'त्या' कोरोना पॉझिटिव्ह सुरक्षा जवानांचे पंढरपूर कनेक्शन... - Divyaprabhat News

Breaking News

Sunday, June 7, 2020

रेल्वेच्या 'त्या' कोरोना पॉझिटिव्ह सुरक्षा जवानांचे पंढरपूर कनेक्शन...

 प्रतिनिधी/पंढरपूर

           कुर्डूवाडी स्टेशन येथे मुंबई येथून बंदोबस्तासाठी आलेले सहा रेल्वेचे सुरक्षा जवान कोरोना पॉझिटिव्ह निघाले. यानंतर या जवानांचे कॉन्टॅक्ट पर्सन शोधण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह सुरक्षा जवानाच्या संपर्कातील काही व्यक्तीं पंढरपूर रेल्वे स्थानकाच्या परिसरातील असल्याचे निष्पन्न झाले आहेत.
       
 याबाबत अधिकचे वृत्त असे की, कोरोना पॉझिटिव्ह असणारे मुंबई येथील सुरक्षा जवान हे बंदोबस्त करता सोलापूर जिल्ह्यात आले होते. यामध्ये सुमारे आठ जवान पंढरपूर रेल्वे स्थानकावर 3 जून च्या आसपास बंदोबस्त करता आले असल्याची माहिती आहे. यानंतर त्यांना कुर्डूवाडी येथे परत बोलावण्यात आले. सदर सुरक्षा जवान पंढरपूर स्थानकासह जेऊर स्थानकावर देखील गेल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
          सध्या सहा कोरोना पॉझिटिव्ह रेल्वेच्या सुरक्षा जवानांच्या संपर्कातील व्यक्तींना प्रशासन ताब्यात घेत आहे. यामध्ये पंढरपूर रेल्वे स्थानकातील काही लोक 'त्या' जवानांच्या संपर्कात आले होते. यांनादेखील हाय रिस्क रूग्ण म्हणून प्रशासन ताब्यात घेऊन त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्याची कार्यवाही करीत आहेत.Pages