इतिहासात पहिल्यांदाच पेट्रोलपेक्षा डिझेल महागले; पहा काय आहेत नवे दर.... - Divyaprabhat News

Breaking News

Wednesday, June 24, 2020

इतिहासात पहिल्यांदाच पेट्रोलपेक्षा डिझेल महागले; पहा काय आहेत नवे दर....



देशभरात आज पुन्हा एकदा इंधनाच्या दरात झाली वाढ...

दिव्य न्यूज नेटवर्क 
          देशभरात आज (बुधवार) पुन्हा एकदा इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. पेट्रोलच्या दरात प्रति लिटर १७ पैसे ते २० पैसे अशी वाढ झाली असून डिझेलच्या दरात प्रति लिटर ४७ ते ५५ पैसे वाढ झाली आहे. महाराष्ट्रात पेट्रोलचा सरासरी दर हा प्रति लिटर ८६.८५ रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर ७७.४९ रुपये इतका झाला आहे. इतिहासात पहिल्यांदाच दिल्लीत पेट्रोलपेक्षा डिझेल महाग झालं आहे.
           आजच्या दरवाढीनुसार, देशातील        महानगरांमधील दरवाढ अशी…

दिल्ली (पेट्रोल – ७९.७६, डिझेल -७९.८८), मुंबई (पेट्रोल – ८६.५४, डिझेल-७७.७६), चेन्नई (पेट्रोल – ८३.०४, डिझेल-७६.७७), कोलकाता (पेट्रोल – ८१.४५, डिझेल-७४.६३) इंधनाचा दर आहे.

राज्यातील महत्वाच्या शहरांमधील पेट्रोलचा दर. ..

१) मुंबई – (पेट्रोल – ८६.५४, डिझेल-७७.७६)

२) नागपूर – (पेट्रोल – ८७.०५, डिझेल-७८.३१)

३) पुणे – (पेट्रोल – ८६.२६, डिझेल-७६.३२)

४) नाशिक – (पेट्रोल – ८६.९०, डिझेल-७६.९४)

५) औरंगाबाद  – (पेट्रोल – ८७.६२,          डिझेल-७८.८५)

कशी होते इंधनाची दरवाढ?
       
  भारतात आता पेट्रोल-डिझेलच्या सुधारित किंमती दररोज सकाळी ६ वाजता जाहीर होतात. जागतिक स्तरावर तेलाच्या किंमती या मिनिटामिनिटाला बदलत असतात. त्याचा थेट परिणाम इंधनाचे वापरकर्ते आणि डिलर्स यांच्या खरेदी किंमतीत होत असतो.         
             भारतातील या इंधनाच्या किंमतींमध्ये उत्पादन शुल्क, व्हॅट, डिलर्सचं कमिशन या बाबींचा समावेश असतो. राज्यांप्रमाणे या करांमध्ये बदल होत असल्याने इंधनाच्या दरांतही बदल दिसून येतात. हे तीनही कर पेट्रोल-डिझेलच्या मूळ दरात समाविष्ट झाल्याने त्यांची किरकोळ विक्रीची किंमत जवळपास दुप्पट होते. त्याचबरोबर रुपयाच्या मुल्याचा डॉलरच्या तुलनेत झालेला बदलही इंधनाच्या किंमतींवर परिणाम होतो. त्यामुळे डॉलरच्या दरात आंतराष्ट्रीय स्तरावर इंधनाचा दर वाढल्यास भारतातही इंधनाच्या दरात वाढ होते


Pages