शासनाच्या निर्णयानुसारच पालखी सोहळा नियोजन भाविकांनी निर्णयाचा मान राखावा :- विभागीय आयुक्त डॉ.म्हैसेकर यांचे आवाहन.. - Divyaprabhat News

Breaking News

Thursday, June 25, 2020

शासनाच्या निर्णयानुसारच पालखी सोहळा नियोजन भाविकांनी निर्णयाचा मान राखावा :- विभागीय आयुक्त डॉ.म्हैसेकर यांचे आवाहन..


 पंढरपूर/प्रतिनिधी
        राज्य शासनाच्या निर्णयानुसारच महापूजा व पालखी सोहळ्याबाबत नियोजन केले जाणार आहे. शासनस्तरावर घेतलेला निर्णय भाविकांच्या व जनतेच्या हिताचा असेल. त्या निर्णयाचा भाविकांनी व जनतेने मान राखून त्याचे पालन करावे असे, आवाहन विभागीय आयुक्त डॉ.दिपक म्हैसेकर यांनी केले.  
     आषाढी वारी बाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक सुहास वारके, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी प्रकाश वायचळ, जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अतिरिक्त पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, प्रांताधिकारी सचिन ढोले, मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे, तहसिलदार वैशाली वाघमारे, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ. जयश्री ढवळे उपस्थित होते.
         
 श्री.म्हैसेकर म्हणाले, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी पालखी सोहळयाची परंपरा अबाधित राखत शासनाने दिलेल्या नियमावली  नुसार ,सार्वजनिक आरोग्याचे रक्षणाच्या दृष्टीने नियोजन करावे लागेल. पालख्या पंढपुरात दाखल झाल्यानंतर पादुकांचे चंद्रभागा स्नान, नगर प्रदक्षिणा, पादुका भेट आवश्यक ठिकाणी मंदीर समिती, नगर पालिका प्रशासन यांनी  नियोजन करावे,
             प्रदक्षिणा मार्गावर स्थानिक नागरिकांची गर्दी होणार नाही यांची दक्षता पोलीस प्रशानाने घ्यावी.  पालखी सोहळ्याबाबत पंढरपूरात नेमण्यात येणाऱ्या पोलीस, आरोग्य व इतर  अधिकारी - र्मचारी यांची स्वतंत्र राहण्याची व आरोग्य तपासणीची व्यवस्था करण्यात यावी. सर्व सोयीनियुक्त सुसज्ज रुग्णालयाची व्यवस्था करावी तसेच आवश्यक ठिकाणी रुग्णवाहीका सज्ज ठेवण्यात याव्यात.चंद्रभागा नदीतील पाण्याची पातळी लक्षात घेता संताच्या पादुका स्नानासाठी   घेवून जाणाऱ्या मानकरी यांच्या सुरक्षतितेच्या दृष्टीने दक्षता घेण्यात यावी.  मानाच्या पालख्या ज्या  मठात थांबणार आहेत त्या मठांची व परिसराची तसेच स्वच्छता गृहाची निर्जंतुकीकरण करावे,  अशा सूचनाही विभागीय डॉ. म्हैसेकर यांनी यावेळी दिल्या.
                     या बैठकीमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालखी सोहळयाचे स्वरूप, सहभागी वारकरी, सोशल डिस्टसिंग, प्रशासकीय यंत्रणेबाबतच नियोजन, मंदीर समिती मार्फत करण्यात येणारे येथील नियोजन  तसेच कारेानाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना यावर सविस्तर चर्चा झाली.



Pages