मंगळवेढा ब्रेकिंग :- त्या पॉझिटिव्ह जावयाच्या संपर्कातील दहा जणांचा अहवाल आला निगेटिव्ह.. - Divyaprabhat News

Breaking News

Wednesday, June 24, 2020

मंगळवेढा ब्रेकिंग :- त्या पॉझिटिव्ह जावयाच्या संपर्कातील दहा जणांचा अहवाल आला निगेटिव्ह..दिव्य न्यूज नेटवर्क
              सोलापूर येथील रिक्षाचालक तथा जावई आपल्या हुन्नूर येथील सासूरवाडीत कुटुंबासह दि.9 जून रोजी रहावयास आला होता. चार दिवसानंतर  त्या जावयास श्‍वसनाचा त्रास होत असल्याने त्याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दि.12 जून रोजी दाखल केले होते. जावयाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने हुन्नूर येथील त्यांच्या कुटुंबातील संपर्कात आलेल्या 10 व्यक्तींना 14 दिवस मंगळवेढा शहरातील मुलींच्या वसतीगृहात इन्स्टिटयूशनल क्वारंटाईन करण्यात आले होते
   
मागील दोन दिवसापुर्वी सदर 10 व्यक्तींचा स्वॅब घेवून तपासण्यासाठी पाठविण्यात आला होता. याचा अहवाल मंगळवारी सायंकाळी प्रशासनास प्राप्त झाला असून ते सर्व अहवाल निगेटिव्ह आले असल्याचे प्रांताधिकारी भोसले यांनी सांगितले.दरम्यान,सोलापूर शहर व ग्रामीण भागात कोरोना या संसर्गजन्य साथीने थैमान घातले असून ग्रामीण भागातही शिरकाव केला आहे.जिल्हयातील जवळपास सर्वच तालुका या साथीने व्यापत आहेत.श्री संत दामाजी पंतांचा मंगळवेढाच या कोरोना साथीपासून चार हात दूर असताना त्या जावयाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नागरिकांमधून भितीचे वातावरण निर्माण झाले होते. परिणामी तालुक्यातील नागरिक भितीच्या सावटखाली असतानाच दहा जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला आहे.
          सोलापूरहून हुन्नूर येथे सासुरवाडीत आलेल्या त्या पॉझिटिव्ह जावयाच्या संपर्कात आलेल्या 10 जणांचा अहवाल मंगळवारी सायंकाळी निगेटिव्ह आल्याने मंगळवेेढेकरांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला असून मंगळवेढा शहरासह ग्रामीण भागात एकही कोरोना बाधित रुग्ण नसल्याची माहिती प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली. 

Pages