राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनी पंढरपूर येथील कोरोना वारीयर्स महिलांचा गौरव... - Divyaprabhat News

Breaking News

Tuesday, June 9, 2020

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनी पंढरपूर येथील कोरोना वारीयर्स महिलांचा गौरव...आरोग्य,पोलीस,आशा सेविका,अंगणवाडी सेविका सन्मानपत्र देऊन होणार सत्कार :- सुवर्णाताई बागल

मोहोळ/प्रतिनिधी
            जगावर आलेल्या महामारीच्या संकटात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता,घरदार विसरून महाराष्ट्राला अभिप्रेत असलेला खरा महाराष्ट्रधर्म जागवत अविरतपणे कोरोनाशी लढा देत आलेल्या संकटाला न घाबरता त्याच्याशी ताठ मानेने लढण्याची उज्वल परंपरा आणि वारसा राष्ट्रमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले,अहिल्यादेवी होळकर, रमाई आंबेडकर यासह इतर अनेक स्त्रियांच्या रूपाने महाराष्ट्राला लाभला आहे. त्यांच्याच विचारांवर आणि आदर्शावर पाऊल ठेवत आपण करत असलेलं हे महान कार्य सबंध देशासाठी, महाराष्ट्रासाठी आणि सर्वांसाठी निश्चित चप्रेरणादायी असून राष्ट्रवादी काँग्रेसची महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनी समाजातील कोरोना वारीयर्स महिलांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव सुवर्णाताई बागल यांनी केले आहे.
               
 सामाजिक काम हेच कर्तव्य म्हणून बजावताना पोलीस विभाग,आरोग्य सेविका,अंगणवाडी कर्मचारी व आशा सेविका यांच्याकडून होत असलेले कार्य कोणत्याही व्रतापेक्षा कमी नाही आणि महाराष्ट्र हे कधीही विसरू शकणार नाही.आपल्या सेवारूपी कार्यास राष्ट्रवादी महिला काँग्रेस सलाम करते.त्यामुळे पुढे येणाऱ्या राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून शरदचंद्रजी पवार यांनी पक्षरूपी लावलेले रोपटे आज मोठा वटवृक्ष झाला आहे.त्याचा वर्धापन दिन आज असून तो वर्धापन दिन साजरा करत असताना कोणताही डामढोल न करता कोरोना महामारीवर लढत असलेल्या लढवयांचा आदर सत्कार होणार असल्याचे सुवर्णाताई बागल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
          
खालील योद्ध्यांचा होणार आदर सत्कार व दिले जाणार सन्मानपत्र....
डॉक्टर:-
          डॉ.राजश्री धनंजय सालविठ्ठल, डॉ.वृषाली पाटील,डॉ.वैशाली कांबळे,डॉ.पल्लवी पाटील,नर्स-रिना राजन जेम्स,पुष्पलता रोहिदास जाधव
पोलीस डिपार्टमेंट:- 
            पंढरपूर ग्रामीणच्या पोलीस ललिता हलसंगी व मोनिका वाघे
अंगणवाडी सेविका:-
          सारिका सनगर मुख्यसेविका,सेविका  जयश्री सोनवणे,पंचशीला कांबळे,संगीता नले,अन्नपूर्णा गायकवाड
आशा वर्कर:-
            सारिका बागल,सविता डोके यांना सन्मानित करून सन्मानपत्र देण्यात येणार आहे.

Pages