लग्नाचे अमिष दाखवून महिला पोलिसांवर अत्याचार करणारा होमगार्ड गजाआड.. - Divyaprabhat News

Breaking News

Thursday, June 4, 2020

लग्नाचे अमिष दाखवून महिला पोलिसांवर अत्याचार करणारा होमगार्ड गजाआड..
न्यायालयाने सुनावली दोन दिवसाची पोलिस कोठडी


मंगळवेढा /प्रतिनिधी


एका 35 वर्षीय महिला पोलिसाला लग्नाचे अमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार केल्याप्रकरणातील गेली 9 दिवस फरार असलेला  आरोपी तथा होमगार्ड चंद्रकांत अशोक शेंबडे (रा.पेनूर) याला पोलिसांनी शिताफीने अटक करून न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.
           
या घटनेची हकिकत अशी,यातील आरोपी तथा होमगार्ड चंद्रकांत शेंबडे हा सन 2019 मध्ये गणेशोत्सव बंदोबस्तकामी कामती पोलिस ठाण्यात कार्यरत होता.सदर वेळी पिडीत महिला पोलिसाची यावेळी ओळख होवून त्याचे प्रेमात रुपांतर झाले.  तदनंतर आरोपीने सदर पिडीता महिलेस मी पोलिस भरती झाल्यावर लग्न करू असे लग्नाचे अमिष दाखवून तीला लोणावळा,पुणे शहर,तुळजापूर अशा विविध ठिकाणी हॉटेलवर नेवून शारिरिक संबंध ठेवल्याचे सदर पिडीतीने तक्रारीत नमूद केले आहे.या घटनेची फिर्याद दि. 26 मे रोजी दाखल होताच आरोपी फरार झाला होता. तपासिक अंमलदार तथा कामती पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरिक्षक किरण उंदरे यांनी तपासाची सुत्रे वेगाने फिरवून  तब्बल नऊ  दिवस पोलिसांना गुंगारा देणार्‍या होमगार्डला पेनूर परिसरातून आज बुधवारी ताब्यात घेण्यात आले.

Pages