मठ आणि धर्मशाळामध्ये वास्तव्यास येणाऱ्या नागरिकांची माहिती प्रशासनास कळवा:- प्रांताधिकारी सचिन ढोले - Divyaprabhat News

Breaking News

Tuesday, June 2, 2020

मठ आणि धर्मशाळामध्ये वास्तव्यास येणाऱ्या नागरिकांची माहिती प्रशासनास कळवा:- प्रांताधिकारी सचिन ढोले


                                                 
           पंढरपूर/प्रतिनिधी 
                कोरोना विषाणूचा  प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यासाठी आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व मठ आणि धर्मशाळेमध्ये बाहेरील वारकरी व नागरिक  वास्तव्यास असता कामा नये.  जर विनापरवाना कुठलेही नागरिक पंढरपुरात वास्तव्य करत असतील. तर संबंधित मठ चालक आणि धर्मशाळा यांनी तात्काळ प्रशासनास तशी माहिती कळवावी. असे आवाहन प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे.
           कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव असल्याने शासनाकडून आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर योग्य वेळी आवश्यकतेनुसार निर्देश पारित होतील. मात्र तत्पूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहराची काळजी घेण्याच्या दृष्टीने येथील मठामध्ये अथवा धर्मशाळांमध्ये विनापरवाना बाहेरील कुठलाही नागरिक येत असेल. तर संबंधित नागरिकाची माहिती प्रशासनास मठ चालकांनी कळवणे बंधनकारक आहे. जेणेकरून कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर शहरात कुठल्याही  प्रकारचा प्रादुर्भाव होणार नाही. याची दक्षता प्रशासनाला घेता येईल. यादृष्टीने मठाचे व्यवस्थापक आणि  धर्मशाळा चालक यांनी सतर्क राहणे गरजेचे असल्याचेही श्री ढोले यांनी सांगितले.
           
पंढरपूर नगर परिषदेच्या माध्यमातून मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी पंढरपुरातील सर्व मठ आणि धर्मशाळा यांना   नोटीसा बजावल्या आहेत.  या आदेशान्वये  राज्यातील तसेच इतर जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिक, साधकांना पोलिस प्रशासन व महसूल प्रशासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय मठ व्यवस्थापक आणि धर्मशाळा व्यवस्थापक यांनी वास्तव्यास ठेवू नये. तसेच मठांच्या व धर्मशाळेच्या संख्येची व नागरिकांची नोंदणी पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासन यांनी स्वता: जवळ ठेवावी.  तसेच विनापरवानगी कोणताही नागरीक आढळून आल्यास त्यांचावर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम अंतर्गत कारवाई करण्यात येईल. असेही प्रांतधिकारी ढोले यांनी सांगितले आहे.

Pages