करोनावर इंजेक्शन आहे मात्र ते आपल्याला परवडणारं नाही :- शरद पवार - Divyaprabhat News

Breaking News

Saturday, June 27, 2020

करोनावर इंजेक्शन आहे मात्र ते आपल्याला परवडणारं नाही :- शरद पवार


साताऱ्यात शरद पवारांचं वक्तव्य...

दिव्य न्यूज नेटवर्क
             करोना विषाणूवर इंजेक्शन निघालं आहे मात्र ते आपल्याला परवडणारं नाही अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातारा येथे दिली. आपल्या देशात हे इंजेक्शन मिळत नाही. ३० ते ३५ हजार रुपये अशी इंजेक्शनची किंमत असून ते सामान्य माणसाला परवडणारं नाही असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. साताऱ्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शरद पवार रयत शिक्षण संस्थेच्या कार्यकारी मंडळ बैठक व पदाधिकारी निवडीच्या निमित्ताने साताऱ्यात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.आज या बैठकीला उप मुख्यमंत्री अजित पवार ही उपस्थित होते
       
इथली माध्यमं जास्त जागरूक आहेत. त्यामुळे बाहेरून आलेल्या लोकांना जास्त भीती होती इथला करोना बाहेर गेला अशा शब्दांत शरद पवार यांनी माध्यमांनाही टोला लगावला. मुंबई-पुण्यातून बाहेर गेलेले लोक पुन्हा येऊ लागले आहेत. त्यामुळे करोना रुग्ण आणखी वाढण्याची भीती शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.करोना विषाणूनं संपूर्ण देशात थैमान घातलं आहे. देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहे. त्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यात आणखी मोठी भर पडणार आहे अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान करोना व्हायरसवर इंजेक्शन आहे मात्र ते आपल्याला परवडणारं नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.
Pages