धक्कादायक; सोलापूर मध्ये आज 101 कोरोनाग्रस्त रुग्णांची भर;कोरोना बाधित संख्या 1502 वर. 4 रुग्णांचा मृत्यू... - Divyaprabhat News

Breaking News

Friday, June 12, 2020

धक्कादायक; सोलापूर मध्ये आज 101 कोरोनाग्रस्त रुग्णांची भर;कोरोना बाधित संख्या 1502 वर. 4 रुग्णांचा मृत्यू...
सोलापूर/प्रतिनिधी
             सोलापूर महानगरपालिका क्षेत्रात शुक्रवारी सायंकाळी मिळालेल्या माहितीनुसार 255 अहवाल प्राप्त असून त्यापैकी 154 अहवाल निगेटिव्ह आहेत तर 101 पॉझिटिव अहवाल प्राप्त झाले आहेत यामध्ये 66 पुरुष आणि 35 महिलांचा समावेश आहे
         
विशेष म्हणजे शुक्रवार एकाच दिवशी बरे होऊन घरी गेलेली बाधित रुग्णांची संख्या 9 इतकी आहे यामध्ये 8 पुरुष आणि 1 महिला समावेश आहे
              शुक्रवारी 4 जणांचा मृत्यू झाला असल्याची नोंद करण्यात आली असल्याची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे
             आजपर्यंत सोलापूर शहरातील पॉझिटिव्ह आलेल्या बाधितांची संख्या 1502 इतकी आहे एकूण मृतांची संख्या 127 पर्यंत पोचली आहे तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 594 आहे रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेली व्यक्तीची संख्या 781 इतकी आहे


Pages