पंढरपूर तालुक्यात तीन ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित..... - Divyaprabhat News

Breaking News

Thursday, May 28, 2020

पंढरपूर तालुक्यात तीन ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित.....


   पंढरपूर/प्रतिनिधी
         पंढरपूर तालुक्यात बुधवारी  पाच रुग्ण  कोरोना बाधित आढळून आले आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच  प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी  पंढरपूर  तालुक्यातील  ज्या भागात कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्या भागात नव्याने तीन ठिकाणचे क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले असल्याचे आदेश  प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिले आहेत.   
        राज्यात  कोरोना  विषाणूचा  संसर्ग झपाट्याने वाढत आहेत. तालुक्यात  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. शहरातील दोन कोरोना बाधित रुग्णांना वाखरी येथील एमआयटी कॉलेज मध्ये संस्थात्मक विलगिकरण करण्यात आले होते.  कोरोना  विषाणूच्या प्रसार होवू नये यासाठी  कोरोना बाधित रुग्णांकडून दुसऱ्या व्यक्तीस संसर्ग होऊ नये शहरातील ज्ञानेशवर नगर झोपडपट्टी भागातील नागरिक कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आल्याची शक्यता असल्याने  सदर भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.  शहरातील अर्बन बँक ते इंदिरा गांधी चौक,  इंदिरा गांधी चौक ते सावरकर चौक, सावरकर चौक ते शिवाजी चौक तसेच शिवाजी चौक ते अर्बन बँक  या सिमा क्षेत्रातील परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. या भागातील हॉस्पिटल, औषध दुकाने व दुघ विक्री केंद्रे वगळता इतर सेवा पुढील आदेश होई पर्यंत बंद राहतील असे आदेशात नमूद केले आहे. 
          
तसेच पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथील संस्थात्मक विलगिकरण करणात असलेला नागरिक कोरोना बाधित आढल्याने.  गोपाळपूर  गावठाण परिसर केंद्रस्थानी धरुन त्यापुढील तीन किलो मिटर परिसरारातील सर्व सिमा बंध करण्यात आल्या आहेत. तसेच सात किलो मिटरचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्याचबरोबर  मौजे करंकब येथेही कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने  करकंब गावठाण केंद्रस्थानी धरुन त्या पुढील तीन किलो मिटरचा परिसरातील सिमा बंद करण्यात आल्या आहेत. तसेच सात किलो मिटरचा परिसर  प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्याचे प्रांतधिकारी ढोले यांनी आदेशात नमूद केले आहे.
            तालुक्यात घोषित करण्यात आलेल्या प्रतिबंधित क्षेत्रात नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी. घराच्या बाहेर पडू नये. जेणेकरुन आपल्यामुळे दुसऱ्या नागरिकांना त्रास होईल असे वर्तन करु नये. रेड झोन मधून आलेल्या नागरिकांनी होम क्वारंटाईनचे योग्य पालन करावे तसेच बाहेरुन येणाऱ्या नागरिकांची शेजाऱ्यांनी त्वरीत माहिती प्रशासनास द्यावी असे आवाहनही श्री. ढोले योनी केले आहे.

Pages