धक्कादायक:- सोलापूर मध्ये सकाळीच 42 कोरोनाग्रस्त रुग्णांची भर; कोरोना बाधित संख्या 709 वर;तर मृतांची संख्या 67 वर.... - Divyaprabhat News

Breaking News

Thursday, May 28, 2020

धक्कादायक:- सोलापूर मध्ये सकाळीच 42 कोरोनाग्रस्त रुग्णांची भर; कोरोना बाधित संख्या 709 वर;तर मृतांची संख्या 67 वर....


सोलापूर/प्रतिनिधी
        कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने सोलापूरजिल्ह्यात भीतीचे वातावरण वाढले असून कोरोनाचा कहर सातत्याने वाढत चालल्याने सोलापूरजिल्ह्यातील व ग्रामीण भागातील चिंतेत भर पडली आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार सकाळच्या सत्रातच 42 रुग्णांची भर पडली. तर मृत्यू झालेल्यांची संख्याही एकने वाढली. कोरोना नियंत्रणात येत नसल्याने प्रशासनदेखील चिंतेत आहे.
       
आज 28 मे रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत सोलापुरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 709 वर पोहोचली आहे. एकूण मृतांचा आकडा आता 67 वर गेला आहे. गुरुवारी सकाळी 8 वाजता आलेल्या शासकीय अहवालानुसार कोरोनाचे आणखी 42 नवे रुग्ण आढळून आले असून यात 17 पुरुष, तर 25 महिलांचा समावेश आहे. गुरुवारी एका पुरुषाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 67 वर पोहोचली आहे.

Pages