रोपळेतील शिक्षक पानसांडे ठरत आहेत कोरोना वारिअर्स..... - Divyaprabhat News

Breaking News

Monday, May 4, 2020

रोपळेतील शिक्षक पानसांडे ठरत आहेत कोरोना वारिअर्स.....


 पंढरपूर/प्रतिनिधी

     सध्या देशामध्ये कोरोनाने  मोठ्याप्रमाणात थैमान घातले आहे. या कालावधीत वैद्यकीय, स्वच्छता, पोलीस  आदी विभागांसह समाजातील इतर अनेक देवदूत या संकटाचा सामना करीत आहे. या देवदूता प्रमाणेच रोपळे येथील शिक्षक कल्लेश्वर पानसांडे हे आपल्या वाहतूक नियंत्रणाच्या कार्याने कोरोना वारिअर्स ठरत असल्याचे दिसून येत आहे.
             
सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाचा फैलाव पाहता कार्यरत क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणे गरजेचे होत आहे. त्यातच पोलीस प्रशासनाला मोठा ताण पडू लागल्याने जिल्ह्यामध्ये विविध शैक्षणिक संस्थेमध्ये आर एस पी चे शिक्षक आहेत. त्यांची विशेष पोलीस अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात यावी. अशी मागणी सोलापूर जिल्हा वाहतूकचे पोलीस निरीक्षक व्ही. एस. कुर्री यांनी प्रशासनाकडे केली  असताना मागणीचा विचार करून जिल्ह्यातील आर एस पी शिक्षिकांची विशेष पोलीस अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली असून त्याची  पोलीस प्रशासनाला मदत होताना दिसून येत आहे.
      याच आर एस पी शिक्षकांमध्ये रोपळे  येथील श्री शिवाजीभाऊ बाबा पाटील विद्यालयातील आर एस पी चे शिक्षक पानसांडे यांचा समावेश असून त्यांनी स्वच्छेने कोणतेही मानधन न स्वीकारता अशा गंभीर परिस्थितीमध्ये ही देशसेवेला प्राधान्य देऊन रस्त्यावर उतरून वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांची मदत म्हणून कार्य स्वीकारले आहे. या सह त्यांच्यासमवेत इतर पाच  शिक्षिकांचा समावेश असून ते सुद्धा कोरोना वारिअर्स म्हणून कार्यरत आहेत. शिक्षक पानसांडे व त्यांचे सहकारी यांच्याकडून होत असलेल्या या देशसेवेला जिल्ह्याच्या परिसरातील नागरिकांकडून कौतुकाचा सलाम भेटत आहे.
" देशसेवेसाठी आम्ही रस्त्यावर"
         जीवनामध्ये कितीही कठीण प्रसंग आले तरी देशसेवेला प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. याच भूमिकेतून ही देशसेवा आम्ही स्वच्छेने स्वीकारली आहे. रस्त्यावर उतरून आम्ही देशसेवा करीत आहोत. तुम्ही घरी बसून, प्रशासनाला सहकार्य करून देशसेवा करा.
    कल्लेश्वर पानसांडे, शिक्षक

Pages