Barking;सोलापुरात कोरोनाचे 10 नविन रुग्ण; रुग्णांनाची सख्या 145 वर ... - Divyaprabhat News

Breaking News

Tuesday, May 5, 2020

Barking;सोलापुरात कोरोनाचे 10 नविन रुग्ण; रुग्णांनाची सख्या 145 वर ...सोलापूर/प्रतिनिधी
         सोलापुरातील कोरोना बाधितांची संख्या आज 10 ने वाढून 145 झाली आहे.अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. काल सोमवारी रात्री पर्यंत सोलापुरातील बाधितांची संख्या 135 होती . अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली होती सोलापुरात आत्तापर्यंत 2407 जणांची कोरोना स्वँब चाचणी घेण्यात आली . यापैकी 2172 अहवाल प्राप्त झाले आहेत.यात 2027 निगेटिव्ह तर 145 पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत .
     
 जिल्हाधिकारी शंभरकर यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की , आज एका दिवसात सोलापुरात 169 चाचणी अहवाल आले यात 159 निगेटिव्ह तर 10 पॉझिटिव्ह आले आहेत . यामध्ये पुरुष 5 तर 5 महिला असून 1 महीलाचा मृत्यू झाला आहे . आज या भागातील 10 रुग्ण आढळन आले आहेत . यात शास्त्रीनगर मधील एक पुरुष पोलीस मुख्यालय ग्रामीण सोलापूर मधील एक पुरुष सदर बाजार लष्कर मधील एक महिला , राहुल गांधी झोपडपट्टी दोन महिला , हुडको कॉलनी विजापूर रोड एक महिला कामतीपुरा एक महिला दक्षिण सोलापुरातील उळेगाव मधील एक पुरुष नीलम नगर एमआयडीसी मधील एक पुरुष तर वालचंद कॉलेज जवळील एकता नगर मधील एक पुरुषाची नोंद आजच्या बाधित रुग्णांमध्ये झाली आहे.
          आजपर्यंत एकूण नऊ बाधित रुग्ण मृत्यू पावल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने देण्यात आली आहे . त्यामध्ये चार पुरुष तर पाच स्त्रियांचा समावेश आहे आज रूग्णालयात दाखल असलेले बाधित रुग्ण 112 असून 60 पुरुष तर 52 महिला आहेत तर रुग्णालयातून बरे होऊन गेलेले 24 असून त्यापैकी 17 पुरुष तर सात महिला आहेत.
          आज मयत झालेली व्यक्ती ही 63 वर्षाची महिला असून उत्तर सदर बाजार लष्कर परिसरातील रहिवासी आहे 3 मे रोजी रात्री उशिरा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले होते परंतु उपचारादरम्यान 4 मे रोजी पहाटे त्यांचे निधन झाले त्यांचा कोविड 19 टेस्ट पॉझिटिव्ह अहवाल आज सकाळी प्राप्त झाला अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आलेली आहे.

Pages