Barking ; आज 14 नवीन रुग्ण पाँझिटिव्ह;कोरोना रुग्णांची सख्या 128 वर :- जिल्हाधिकारी .. - Divyaprabhat News

Breaking News

Sunday, May 3, 2020

Barking ; आज 14 नवीन रुग्ण पाँझिटिव्ह;कोरोना रुग्णांची सख्या 128 वर :- जिल्हाधिकारी ..सोलापूर/प्रतिनिधी

              सोलापुरात आज 213 जणांचे वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 199 अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत तर पॉझिटिव्ह अहवाल 14 आलेले आहेत. ज्यामध्ये सात पुरूष आणि 7 स्त्री रुग्णांचा समावेश आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.आज रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास ही माहिती देण्यात आली.
     
आकाशवाणी रोड वरील गवळी वस्ती भागातील एक पुरुष तर पोलीस मुख्यालय अशोक चौक येथील दोन पुरुषांचा समावेश आहे .नई जिंदगी एक स्त्री, शास्त्रीनगर येथील दोन स्त्रीया,फॉरेस्ट चांदणी चौक दोन पुरुष एक स्त्री भारतरत्न इंदिरा नगर एक पुरुष एक स्त्री , बापूजी नगर तीन पुरुष स्त्री भद्रावती पेठ एक पुरुष लष्कर सदर बाजार एक स्त्री समावेश आजच्या बाधित व्यक्तीमध्ये होतोय.
       आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या ही 128 झाली असून पुरुष 74 व स्त्रिया 54 आहेत तर मृतांची संख्या ही सहा आहे . रुग्णालयात दाखल असलेले बाधित 103 असून त्यापैकी 57 पुरुष तर 46 स्त्रियांचा समावेश यामध्ये होतो . त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत . रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या बाधितांची संख्या 19 आहे त्यामध्ये पुरुष 14 तर पाच स्त्रीया यांचा समावेश आहे .


Pages