बापरे ; सोलापुरात पुन्हा कोरोनाचा धुमाकूळ आज तब्बल 13 नवीन कोरोनाग्रस्तांची भर; कोरोना रुग्णांनाची संख्या 81वर.. - Divyaprabhat News

Breaking News

Wednesday, April 29, 2020

बापरे ; सोलापुरात पुन्हा कोरोनाचा धुमाकूळ आज तब्बल 13 नवीन कोरोनाग्रस्तांची भर; कोरोना रुग्णांनाची संख्या 81वर..


सोलापूर/प्रतिनिधी

            आज सोलापुरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 81 झाली असून काल ही आकडेवारी 68 होते आज त्यामध्ये तेरा रुग्णांची भर पडली आहे तर 6 मृत असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयातून देण्यात आली आहे
         
सोलापुरात कोरोना बाधितांची संख्या 81झाली आहे मंगळवारी हा आकडा 68 होता परंतु त्यामध्ये बुधवारी 13 रुग्णांची भर झाली असून हा आकडा आता 81 वर गेला आहे  सोलापुरात  आजपर्यंत सहा जणांचा बळी या कोरोना आजाराने घेतला आहे बुधवारी लष्कर तीन, सिद्धार्थ हौसिंग सोसायटी एक ,आंबेडकर नगर 1 ,शामानगर एक, मार्कंडेय नगर 1 ,इंदिरानगर तीन, शनिवार पेठ 1 शास्त्रीनगर एक ,ताई चौक एक असे 13 नव्याने रुग्ण मिळाले आहेत  आजपर्यंत आयसोलेशन रुग्णांची संख्या 1624 असून प्राप्त तपासणी अहवाल  1250 आहेत प्रलंबित तपासणी अहवाल 374 तर निगेटिव्ह अहवाल 1169 आहेत, पॉझिटिव्ह अहवाल 81 आले आहेत या 81 रुग्णांपैकी सहा जणांचा मृत्यू झाला असून 75 रुग्णांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत त्यामध्ये 43 पुरुष व 32 स्त्रियांचा समावेश आहे, महाराष्ट्रामध्ये केवळ सोलापूर शहरातच सारी या आजाराचे सर्वाधिक रुग्ण समोर आल्याची माहिती आहे आतापर्यंत तब्बल 21 रुग्ण हे सारी चे आढळून आल्याचं पाहायला मिळतय,

Pages