Corona Breaking :- सोलापुरात 5 नवे रुग्ण ;कोरोना रुग्णांची संख्या 30 वर...... - Divyaprabhat News

Breaking News

Tuesday, April 21, 2020

Corona Breaking :- सोलापुरात 5 नवे रुग्ण ;कोरोना रुग्णांची संख्या 30 वर......

सोलापूर/प्रतिनिधी
         सोलापुरात मंगळवारी पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण शास्त्रीनगर मदर इंडिया झोपडपट्टी मोदीखाना जोशी गल्ली शनिवार पेठ येथील आहेत कोरणा पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या तीस झाली असून त्यापैकी आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे असे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले
           
सोमवारी एकाच दिवशी दहा कोरनाबाधित रुग्ण सापडले. तर मंगळवारी पुन्हा पाच रुग्ण आढळले आहेत यामध्ये बापूजी नगर जवळील मदर इंडिया झोपडपट्टी जोशी गल्ली शनिवार पेठ शास्त्रीनगर आणि मोदीखाना येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे आत्तापर्यंत शहरात सहा हॉटस्पॉट झाले होते आता मोदी खाना या नव्या सातव्या हॉटस्पॉट ची भर पडली आहे कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्यामुळे शहरात चिंतेचे वातावरण वाढले आहे आता दोन मृतास धरुन २५ वर आकडा गेलाय.
             शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या २३ आहे. त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. शहरात आजपर्यंत दोघा रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर सातत्याने शहरातील कोरोनाबाधित रुग्णाच्या संख्येत भर पडत असल्याने शहरवासियांची चिंता वाढली आहे.
बापूजीनगर मध्ये १, कुर्बान हुसेन नगर १, पाच्छापेठ ६, जगन्नाथ नगर १, भद्रावती पेठ १ असे आढळलेले रुग्ण आहेत. यातील दोन रुग्ण हे सारी मधले असून इतर चार जण कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णाच्या संपर्कात आल्याने झाले आहे.
           सध्या आयसोलेशनमध्ये असलेल्यांची संख्या ८९२ असून त्यापैकी ६३० जणांचा अहवाल प्राप्त झ‍ाला तर १६२ प्राप्त झाले नाही तर ६०५ जणांचा अहवाल निगेटिव्ह अाला तर एक २५ पॉझिटिव्ह आढळले आहेत.

Pages