Breaking:-सोलापूरसाठी धक्कादायक बातमी!सोलापुरात आणखी चार रुग्ण पॉझिटिव्ह आढळले ; रुग्णांची संख्या पंचवीस वर.... - Divyaprabhat News

Breaking News

Monday, April 20, 2020

Breaking:-सोलापूरसाठी धक्कादायक बातमी!सोलापुरात आणखी चार रुग्ण पॉझिटिव्ह आढळले ; रुग्णांची संख्या पंचवीस वर....




सोलापूर/प्रतिनिधी
           सोलापुरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता तब्बल 25 झाली आहे.जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ही माहिती आज सोमवारी सायंकाळी सात वाजता दिली.
         
  आत्तापर्यंत सोलापुरात 692 कोरोना संशयितांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे .यापैकी 630 अहवाल प्राप्त झाले आहेत. यात 605 जणांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. तर 25 जणांची  कोरोना चाचणी  पॉझिटिव्ह आली आहे 25 पैकी 2 दोन कोरोना रुग्णांचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे.  23 जणांवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज  67 जणाचे अहवाल प्राप्त झाले. यात 57 निगेटिव्ह तर 10 पॉझिटिव्ह अहवाल आहेत यात पाच्छा पेठ परिसरातील 6 तर बापुजी नगर, कुर्बान हुसेन नगर ,भद्रावती पेठ, आणि जगन्नाथ पुरम येथील प्रत्येकी एक असे रुग्ण आढळून आले आहेत हे सर्व परिसर पोलिसांनी बंदिस्त केले असून या भागातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे; ही माहितीही जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
          सोलापुरात आज दुपारी 2 वाजल्यापासून संचारबंदी लागू झाली आहे. हॉस्पिटल सुरू आहेत मात्र खाजगी मेडिकल दुकान, किराणा भाजी फळ विक्री ही सर्व दुकाने बंद करण्यात आली आहेत पेट्रोल पंपावर ही फक्त अत्यावश्यक सेवेतील पाच धारकांनाच पेट्रोल दिला जात आहे. इतरांना पेट्रोल बंद करण्यात आल आहे. संचारबंदीचा अंमल काटेकोर व्हावा या दृष्टीने पोलिसांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत गल्लीबोळात गप्पा मारत बसणाऱ्यांना, गर्दी करणाऱ्यांना पोलीस हुसकावून लावत आहेत. काही ठिकाणी ताब्यातही घेण्यात आले.
         सोलापुरात आज दुपारी दोन वाजल्यापासून पूर्णपणे संचारबंदी आदेश लागू झाले आहेत.अत्यंत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा आता २३ एप्रिल च्या मध्यरात्रीपर्यंत बंद राहतील,यात किराणा दुकान ,खाजगी औषध दुकान,बँका,भाजीपाला यांचाही समावेश आहे.पेट्रोल पंपावर ही आता केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी,वैद्यकिय विभागाची वाहनं यांनाच पेट्रोल मिळणार आहे.
      इतरांना पेट्रोल मिळणार नाही.सोलापूरकरांनी आज पासूनच्या संचारबंदीचा अत्यंत काटेकोरपणे पालन करावं.रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी एकटे किंवा एकत्रितपणे येणे टाळावेच असे आवाहनही जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केलं आहे. कोरोना ची वाढती साखळी ब्रेक करण्यासाठी यापेक्षा वेगळा उपाय सध्या तरी नाही असेही ते म्हणाले.

Pages