पाठकळ येथे स्वस्त धान्य दुकानात मोफत तादुंळ वाटप..... - Divyaprabhat News

Breaking News

Tuesday, April 21, 2020

पाठकळ येथे स्वस्त धान्य दुकानात मोफत तादुंळ वाटप.....


मंगळवेढा/प्रतिनिधी 
         पाटकळ ता मंगळवेढा येथील स्वस्त धान्य दुकान चालक शहाजी उन्हाळे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून प्राप्त झालेला तांदूळ वाटप करण्यास सुरूवात केली आहे. यावेळी पाटखळ मधील पोलीस पाटील आनंद कोळेकर शासकीय कर्मचारी आण्णासाहेब चव्हाण व तलाठी शामबाला कुंभार,कोतवाल बलभीम सावंत ,उमेश शिरसागर ग्रामपंचायत कर्मचारी विनायक खुळे,राहुल ताड
उपस्थित होते.
     
प्रत्येक माणसागणिक पाच किलो प्रमाणे तांदूळ वाटप करण्यास सुरूवात झाली असुन ग्रामस्थांनी सकाळी आठ ते सायंकाळी सहा या वेळेमध्ये 158 लोकांना तांदूळ वाटप झाले आहे. यावेळी यामध्ये सर्व गावकऱ्यांनी सोशल डिस्टसिंगचे तंतोतंत पालन करून गावकऱ्यांनी चांगल्या प्रकारचे सहकार्य केले आहे.

आम्ही दिवसभर 158 लोकांना माल वाटप केला आहे त्यावेळेस माझ्या सोबत दिवसभर पोलिस पाटील आंनद कोळेकर आण्णासाहेब चव्हाण (गुरुजी) तलाठी मँडम शामबाला कुभार ग्रामपंचायत ऑपरेटर विनायक खुळे,राहुल ताड यांचे सहकार्य लाभले
पाटखळ स्वस्त धान्य दुकानदार
शाहजी हनुमंत उन्हाळे

Pages