सोलापुरकरांच्या चिंतेत आनखीन नविन भर !तीन नवे परिसर पोलिसांकडून सील... - Divyaprabhat News

Breaking News

Monday, April 20, 2020

सोलापुरकरांच्या चिंतेत आनखीन नविन भर !तीन नवे परिसर पोलिसांकडून सील...


सोलापूर/प्रतिनिधी
         पाच्छापेठ, रविवार पेठ आणि ७० फूट रोडवरील इंदिरा नगर, अशी तीन ठिकाणे पोलिसांनी प्रतिबंधित म्हणून घोषित केली आहेत. सोमवारी (ता. २०) त्यात आणखी वाढ झाली असून बापूजी नगर, कुर्बान हुसेन नगर आणि शेळगीतील आयोध्या नगर पोलिसांनी सील केले आहे.
       
रविवारपर्यंत सोलापुरात कोरोनाबाधित रुग्णाची संख्या १५ होती. आज त्यात वाढ झाल्याचे पोलिस आयुक्त अंकूश शिंदे यांनी सांगितले. वाढलेले रुग्ण बापूजी नगरातील एक, शेळगातील आयोध्या नगर आणि कुर्बान हुसेन व पाच्छा पेठ येथील असल्याचेही ते म्हणाले. तर बापूजी नगरातील रुग्ण अक्कलकोट रोड एमआयडीसीत मजूर आहे. मात्र लॉकडाउनमुळे तो आई चालवत असलेल्या किराणा दुकानात बसत होता. तर पाच्छा पेठेतील नवे रूग्ण त्या महिलेच्या संपर्कातील आहेत. कुर्बान हुसेन नगरातील कोरोनाबाधित रुग्णाने रुग्णवाहिकेतून प्रवास केल्याची माहिती पोलिसांकडे आहे.
 पोलिस कर्मचाऱ्यांना दिले प्रशिक्षण..
              कोरोना या विषाणूविरूद्धची लढाई जिंकण्यासाठी पोलिस अधिकारी व कर्मचारी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी रस्त्यांवर बंदोबस्त देत आहेत. पोलिसांच्या सुरक्षिततेसाठी सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले आहे. सोलापूर कोरोनामुक्त होण्यासाठी लक्षणे तथा त्रास होणाऱ्या व्यक्तींनी स्वतःहून पुढे यायला हवे. ज्या भागात रुग्ण आढळतात तो संपूर्ण परिसर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सील केला जातो. वारंवार आवाहन करूनही नागरिक रस्त्यांवर दिसत आहेत. यापुढे संचारबंदीची कारवाई कठोर केली जाईल.
- अंकूश शिंदे, पोलिस आयुक्त

Pages