शहरात मटका घेणार्‍या दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात... - Divyaprabhat News

Breaking News

Thursday, March 19, 2020

शहरात मटका घेणार्‍या दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात...


मंगळवेढा/प्रतिनिधी
               मंगळवेढा शहरातील शिवप्रेमी चौकात येणार्‍या जाणार्‍या लोकांकडून अंदाजे येणार्‍या आकडयावर पैशाची पैज लावून कल्याण मटका घेणार्‍या दत्तात्रय शिवाजी जाधव (रा.मरवडे) व सिध्देश्‍वर नामदेव ननवरे(रा.शरदनगर) या दोघांवर पोलिसांनी मुंबई जुगार कायदयान्व्ये गुन्हा दाखल करून कारवाईसाठी ताब्यात घेतले आहे.
             पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती,मंगळवेढा शहरातील शिवप्रेमी चौकात वरील दोघे आरोपी येणार्‍या जाणार्‍या लोकांकडून अंदाजे येणारे अंक आकडयावर पैशाची पैज लावून कल्याण नावाचा मटका घेत असल्याची गोपनीय माहिती डी.वाय.एस.पी.दत्तात्रय पाटील यांना मिळताच त्यांनी पोलिसांमार्फत छापा टाकला असता तेथे आकडे लिहिलेच्या चिठ्ठया,बॉलपेन,रोख 1100 रुपये,जुगाराचा चार्ट आदी साहित्य मिळाले असून पोलिसांनी ते जप्त केले आहे.याचा अधिक पोलिस नाईक वाघमोडे करीत आहेत.
           
   दरम्यान,तत्कालीन पोलिस अधिक्षक विरेश प्रभू यांनी हद्दपार केलेला मटका मंगळवेढा शहरात  पुन्हा खुले आम सुरु झाला आहे.प्रामुख्याने यामध्ये दैनंदिनी शेतावर कामास जाणारे मजूर यात अमिषापोटी भरडले जावून त्यांचे प्रपंच उघडे पडत आहेत.शहरासाठी  एक सहाय्यक फौजदारासह अन्य पाच स्वतंत्र पोलिस कर्मचारी असतानाही अवैध धंदे डोके वर काढत असल्याचे शहरवासियांमधून चर्चा आहे.शहरातील कायदा  सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महिन्याकाठचा हिशोब करण्यापेक्षा अवैध धंदे हद्दपार करणे जनतेच्या दृष्टीने हिताचे असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहेत
   
शहरामध्ये खुलेआम मटका सुरु असताना एकाच ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून डोंगर पोखरून उंदिर काढल्याचा प्रताप केल्याच्या प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.शहरातील पुर्णतः मटका हद्दपार शहर बीट पोलिसांनी आपल्या कामगिरीची चुणूक दाखवून दयावी अशी मागणी होत आहे.

Pages