गर्दी टाळा,स्वच्छता पाळा प्रांतधिकारी सचिन ढोले यांचे आवाहन.. - Divyaprabhat News

Breaking News

Thursday, March 19, 2020

गर्दी टाळा,स्वच्छता पाळा प्रांतधिकारी सचिन ढोले यांचे आवाहन..



     पंढरपूर/प्रतिनिधी
        कोरोना विषाणूच्या प्रतिबंधात्मक उपयायोजनेसाठी प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून  सुक्ष्म  नियोजन केले असून, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी  नागरिकांनी आवश्यकती खबरदारी घेणे गरजेचे आहे. या आजाराला घाबरून न जाता आवश्यक ती काळजी घ्यावी. तसेच नागरिकांनी आवश्यकता नसेल, तर गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. असे आवाहन प्रांतधिकारी  सचिन ढोले यांनी केले आहे.  
         कोरोना विषाणूंच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबत नवीन भक्त निवास, पंढरपूर  येथे  बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाचे प्र. वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रदिप केचे उपस्थित होते.
           
यावेळी प्रांतधिकारी  ढोले बोलताना म्हणाले, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी सामुहिक संपर्क ज्या ठिकाणी निर्माण होईल अशा ठिकाणी स्वत:हून जाणे टाळावे. आवश्यकता असेल तरच नागरीकांनी घराबाहेर पडावे. आवश्यकता भासल्यास नगरपालिकेच्या संसर्गजन्य वार्ड व 65 एकर येथील एमटीडीसीच्या निवासी संकुलात वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. आरोग्य विभागाने  व नगरपालिकेने ‘कोरोना’  विषाणूंच्या प्रतिबंधात्मक उपाय योजनेबबात  व्यापक जनजागृती करावी, तसेच सार्वजनिक स्वच्छतागृह, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवण्याबाबतच्या सूचनाही बैठकीत प्रांतधिकारी ढोले यांनी दिल्या.
          कोरोना विषाणूच्या प्रतिबधात्मक उपाययोजनेसाठी पंढरपूर शहरात व ग्रामीण भागात कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. तालुक्यातील  गावांमध्ये संबंधित गावचे  ग्रामसेवक, आरोग्य सेवक व पोलीस पाटील यांचे संयुक्त पथक तयार केले  आहे. तसेच नगरपालिकेच्या 17 प्रभागामध्ये प्रत्येकी 4 जणांचे पथक तयार केले असून या पथकाच्या माध्यमातून सर्वेक्षण व जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच परदेशातून आलेल्या प्रवाश्याकडून ‘ए’ फॉर्म भरुन घेणार असून त्यामध्ये प्रवास संपूर्ण तपशिल आदीबाबत माहिती घेण्यात येणार आहे. तालुक्यातील 7 जणांचे अलगीकरण स्वता:च्या घरातच करण्यात येत असून , 14 दिवस दररोज  वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. याबाबत त्यांच्यात काही लक्षणे आढळून आल्यास त्यांचे ‘स्क्रिनिंग’ करुन पुढील तपासणीसाठी  सोलापूरला पाठविण्यात येणार असल्याची माहिती  तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बोधले व प्र. वैद्यकीय अधिक्षक  डॉ.केचे यांनी दिली.
 तसेच कोरोना विषाणूच्या प्रतिबंधात्मक उपयायोजनेसाठी आरोग्य विभाग सज्ज असून, मुबलक प्रमाणात औषधसाठा व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपलब्ध असून, उपजिल्हा रुग्णालयात 2 व खासगी रुग्णालया 29 व्हेटींलेटरची सोय करण्यात आली असल्याचेही  प्र. वैद्यकीय अधिक्षक  डॉ.केचे यांनी  सांगितले.
             यावेळी नागरीकांनी यात्रा, जत्रा, मोठे उत्सव याठिकाणी होणारी गर्दी टाळण्याचे आवाहन  करुन  कुठेही  गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन  प्रांतधिकारी ढोले यांनी केले आहे.

Pages