मनिषा भोसले चव्हाण यांना आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्काराने सन्मानित... - Divyaprabhat News

Breaking News

Sunday, March 8, 2020

मनिषा भोसले चव्हाण यांना आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्काराने सन्मानित...


''जागतिक महिला दिन "याचे औचित्य साधत..


मंगळवेढा/प्रतिनिधी 

        जिल्हा परिषद सोलापूर महिला व बाल विकास विभाग सोलापूर यांच्या वतीने सन २o१८-२०१९ चा आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्काराने मनिषा भोसले चव्हाण यांचा सन्मान करण्यात आला . 
             
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मा . अनिरूध्द कांबळे यांच्या अध्यक्षेते खाली व मा . मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला यावेळी मनिषा चव्हाण अंगणवाडी सेविका बिलेवस्ती( पाटकळ) ता.मंगळवेढा यानां मा .सभापती महिला व बाल कल्याण स्वाती शटगार यांच्या हस्ते आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी महिला व बाल कल्याणच्या माझी सभापती रजनीताई देशमुख 'जिं प .सदस्या मंजुळाताई कोळेकर', आनंद तानगावडे, विजयराज डोंगरे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी जावेद शेख आदी उपस्थित होते प्रामाणिकपणे केलेल्या कामाचे कधी ना कधी फळ मिळतेच. प्रशासनाने त्यांच्या विविध शैक्षणिक उपक्रमाची, कामाची दखल घेत आज त्यांना आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार  देवून सन्मानित करण्यात आले.
           त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल मंगळवेढा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, बाल विकास प्रकल्प अधिकारी समाधान नागणे, सुपरवाइझर आनुराधा शिंदे आदीने त्यांचे अभिनंदन केले.

Pages