विनयभंग व मारहाण प्रकरणात कृषीभूषण अंकुश पडवळे सह सात जणांना तीन दिवसाची पोलिस कोठडी.... - Divyaprabhat News

Breaking News

Monday, March 9, 2020

विनयभंग व मारहाण प्रकरणात कृषीभूषण अंकुश पडवळे सह सात जणांना तीन दिवसाची पोलिस कोठडी....


     खुपसंगी येथील घटना

मंगळवेढा/प्रतिनिधी

        खुपसंगी येथील विवाहित महिलेच्या घरी जावून विनयभंग केल्याप्रकरणी चंदू मदने,पांडु लवटे,दादा लवटे तर दुसर्‍या घटनेत लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी  दिनेश लेंगरे,अंकुश उर्फ तुकाराम पडवळे,बिरा लवटे,कुशाबा पडवळे(रा.सर्व खुपसंगी) या परस्पर विरूध्द गुन्हे दाखल असलेल्या सात जणांना पोलिसांनी अटक करून न्यायाधीश  आर.व्ही.नडगदल्ली यांच्या समोर उभे केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.या घटनेची हकिकत अशी,यातील पिडीत विवाहित महिला ही दि.5 रोजी सायंकाळी 4.00 वा. खुपसंगी येथील घरात असताना आरोपी चंदू मदने,पांडु लवटे,दादा लवटे,गिरजाप्पा चौगुले आदी चौघांनी तुइया नवर्‍याला फोन करून बोलव असे म्हणून  पिडीत महिलेच्या अंगावरील साडी ओढून तीच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य करून गळयातील अडीच तोळयाचे गंठण घेवून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.तर दुसर्‍या घटनेत पांडुरंग लवटे यांनी दिलेल्या फिर्यादीत दि.4 रोजी रात्री 11.30 वा. यातील आरोपी दिनेश लेंगरे,अंकुश उर्फ तुकाराम पडवळे,बिरा लवटे,कुशाबा पडवळे यांनी फिर्यादीचे लवटे वस्ती येथे रहाते घरासमोर येवून तुकाराम बाबा चौगुले यांच्याविरूध्द पंढरपूर न्यायालयात सुरु असलेल्या केसमध्ये साक्षीला वेळेवर हजर का रहात नाही त्यामुळे केस लांबणीवर पडत आहे.आमच्या नातेवाईकांच्या बाजूने साक्ष का देत नाही
असे म्हणून आरोपींनी लोखंडी रॉडने फिर्यादीचे डाव्या हातावर,खांदयावर मारहाण करून गळयातील अडीच तोळयाची सोन्याची चेन काढून घेतल्याचे फिर्यादी म्हटले आहे. या घटनेतील गिरजाप्पा चौगुले हा फरार झाला असून इतर सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.तपासिक अंमलदाराने मुद्देमाल  जप्त करणे,हत्यार जप्त करणे, फरार आरोपीचा शोध घेणे आदी मुद्दे न्यायालयासमोर मांडल्यानंतर न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Pages