मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची आ.भारत भालके यांची मागणी.... - Divyaprabhat News

Breaking News

Monday, March 2, 2020

मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची आ.भारत भालके यांची मागणी....


मंगळवेढा/प्रतिनिधी
        मंगळवेढा पंढरपूर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष,डाळिंब,केळी,ज्वारी, हरभरा,गहू,मका,करडी व तुर पिकाचे मोठे नुकसान होऊन शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसल्याने याबाबत आज विधानासभेत आ.भारत भालके यांनी पाॅईन्ट ऑफ इन्फरमेशन चे आयुध वापरत पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील गारपीट व वादळी वाऱ्यासह झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेल्या स्थितीत पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केली असता त्यांनी संबंधितांना तात्काळ आदेश दिलेले आहेत
           
  मंगळवेढा पंढरपूर तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून अवकाळी पावसाने थैमान घातले असून दोन्ही तालुक्यात द्राक्ष, डाळिंब,केळी, बोर,आंबा या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे तसेच काही पिकांचा मोहोर गळाला आहे तसेच गहू ज्वारी, हरभरा, मका ,करडई व तुर  या काढणी झालेल्या पिकांचे ही मोठे नुकसान झाल्याचे आ.भारत भालके यांनी विधानसभेत सभागृहाच्या निदर्शनास आणुन दिले व तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली त्यावर विधानसभा अध्यक्षांनी  यावर  भरपाई देण्याचे आदेश  दिले आहेत  तसेच यावेळी आ.भारत भालके यांनी काही बियाणे उत्पादक कंपन्या कडून शेतकऱ्यांना महागड्या दरात निकृष्ट पद्धतीचे बियाणे माथी मारून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान केले जात असल्याचे  सरकारच्या निदर्शनास आणून दिले व त्यावर  चर्चा घडवून आणली यावेळी
            आ.भालके बोलताना म्हणाले की शेतकरी महाग दराने बियाणे आणून पेरतो परंतु निकृष्ठ असल्यामुळे काही कंपन्याचे बियाणे उगवत नाही परंतु शेतकऱ्यांच्या मशागतीचा खर्च होतो, उत्पन्न बुडते त्या मुळे शेतकऱ्यांचे वर्ष वाया जाते  मात्र मशागतीचा खर्च ,बँकांचे  कर्ज, त्यावरील व्याज इ. यामुळे शेतकरी जास्त अडचणीत येतो परंतु शेतकऱ्याने तक्रार केली तर केवळ  सबंधीत कंपनी व व्यापाऱ्यावर फक्त फसवणुकीचा गुन्हा दाखल होतो शेतकऱ्याला मात्र भरपाई मिळण्यात अनेक अडचणी आणल्या जातात  त्यामुळे  विशेष करून सरकारने शेतकऱ्यांच्या बाबतीत सकारात्मक विचार करून ज्या शेतकऱ्यांना चुकीच्या व बोगस बियाने औषधामुळे नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांचे  होणारे नुकसान त्याचे क्षेत्र मोजुण,मिळणारे उत्पन्न याचा विचार करून नुकसान भरपाई सबंधीत कंपनीकडून वसुल करून ती भरपाई कायद्याने देणे आवश्यक आहे ती शेतकर्याना देणार का?
                असा प्रश्न उपस्थित करून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली त्यावर कृषिमंत्री दादाजी भुसे यानी सरकार याबाबत शेतकऱ्यांच्या बाजूने असून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सबंधीत कंपनीकडून नुकसान देण्यासाठी आंध्रप्रदेश सरकारपेक्षा कडक कायदा  केला जाईल जेणेकरून  भविष्यात शेतकऱ्यांची  फसवणूक होऊन त्यांच्यावर अन्याय होणार नाही असे सांगितले.

Pages