पंढरपूर- मंगळवेढा ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्तीसाठी 25 कोटी 10 लाख रुपयांचा निधी :- आ.भारत भालके - Divyaprabhat News

Breaking News

Tuesday, March 17, 2020

पंढरपूर- मंगळवेढा ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्तीसाठी 25 कोटी 10 लाख रुपयांचा निधी :- आ.भारत भालके


मंगळवेढा/प्रतिनिधी
         पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघांमधील ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्ती व पुलाचे बांधकाम करन्यासाठी महाविकास आघाडी सरकारने 2020 -21 या अर्थसंकल्पामध्ये 25 कोटी 10 लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती आमदार भारत भालके यांनी दिली.
              पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील ग्रामीण भागातील अनेक रस्ते खराब झाल्यामुळे त्या भागातील नागरिकांची शेतकऱ्यांची विद्यार्थ्यांची सतत गैरसोय होत होती. तसेच काही  ठिकाणी ओढ्यावर पूल पावसाळ्यात सर्वांचीच गैरसोय होत होती त्यामुळे प्रवाशाना वाहतूक करताना अनेक अडचणी येत होत्या  त्यामुळे नागरिकांच्या अडचणी लक्षात घेता नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आमदार भारत भालके यांनी राज्याचे मुख्यमंत्री  उद्धवजी ठाकरे ,उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा पवार  सार्वजनिक बांधकाम मंत्री  अशोकराव चव्हाण  व सार्वजनिक  बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे मामा यांचेकडे रस्ते व पुलाच्या कामासाठी निधीची तरतूद व्हावी म्हणून पाठपुरावा केला होता. त्या पाठपुराव्याला यश येऊन मंगळवेढा तालुक्यातील रस्ते व पुलांच्या सुमारे 25 कोटीचा निधी मंजूर झाला आहे  तो पुढील प्रमाणे 

           1)खैराव लोणार जाडर बबलाद रस्ता रामा 385 मध्ये पुलाचे बांधकाम करणे व दोन्ही बाजूस रस्ता मजबुतीकरण करणे ता मंगळवेढा 300 लाख.
            2) बोराळे मंगळवेढा प्रजिमा 61 रस्त्यावरील लिंगीरा ओढा येथे पुलाचे बांधकाम करणे 200 लाख.
            3) उचेठाण बठाण ब्रह्मपुरी माचणूर रहाटेवाडी बोराळे बालाजी नगर कागष्ट हुलजंती रस्ता रा मा 392 किमी 33/00 ते 47/00 मध्ये सुधारणा करणे  240 लाख. 
          4)मंगळवेढा भाळवणी निंबोणी बावची सलगर रस्‍ता प्रजिमा 73 किमी 10 600 ते 17 600 मध्ये सुधारणा करणे. 200 लाख.
         5) बोराळे सिद्धापूर रस्ता प्रजिमा 63 की मी 0/00 ते 9/ 600 मध्ये सुधारणा करणे ता मंगळवेढा 230 लाख.
              6) लक्ष्मी दहिवडी आंधळगाव पाटखळ हाजापूर भाळवणी तळसंगी रस्‍ता प्रजिमा 74 किमी 28/00 ते 36/ 600 मध्ये सुधारणा करणे तालुका मंगळवेढा 300 लाख.
             7) निंबोणी चिक्कलगी शिरनांदगी रस्ता  प्रजिमा 161 किमी 0/00ते 5/ 100 मध्ये सुधारणा करणे तालुका मंगळवेढा 275 लाख.
            8) खर्डी तावशी एकलासपूर शिरगाव नेपतगाव रामा 393 किमी 51 680 ते 53 680 व बोहाळी टाकळी पंढरपूर रस्ता रामा 388 किमी16/00 ते  27/ 750 मध्ये सुधारणा करणे तालुका पंढरपूर 200 लाख. 
           9) बाजीराव विहीर गादेगाव कोर्टी बोहाळी खर्डी रस्ता रामा 391 किमी 21/ 500 ते 29/ 500 मध्ये सुधारणा करणे ता.पंढरपूर  175 लाख. 
            10) खर्डी ते तपकिरी शेटफळ रस्ता प्रजिमा 111 कि.मी 0/00 ते  5 / 900 मध्ये सुधारणा करणे ता. पंढरपुर 190 लाख.
           11) कासेगाव- पंढरपूर जुना रस्ता प्रजिमा 168 किमी 41 /150 ते 46/ 150 मध्ये रुंदीकरणासह सुधारणा करणे ता. पंढरपूर. 200 लाख.
                  वरील दोन पुलांच्या कामासाठी व 9 रस्त्यांच्या 71 किलोमीटर लांबीच्या कामासाठी 25 कोटी 10 लाख रुपये इतक्या रकमेची तरतूद झालेली आहे.
मार्च दोन हजार वीस च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये महाविकास आघाडीच्या सरकारने झुकते माप दिले असून त्यांनी 35 गाव योजना बसवेश्वर व चोखामेळा स्मारक ,उजनीच्या अपुऱ्या कामांना निधी देत मतदारसंघावरील प्रेम दाखवून देत विशेष बाब म्हणून सरकारने   माझे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील रस्ते दुरुस्तीच्या व पुलांच्या बांधकाम करण्यासाठी   पंचवीस कोटी दहा लाख रुपये निधीची तरतूद केल्याने ग्रामीण भागातील रस्ते चकाचक होण्यास मदत होणार असून प्रवाशांची व वहानधारकांची  सोय होणार आहे  
            तसेच सरकारने केलेल्या मदतीबद्दल या मतदारसंघाचे आमदार म्हणून मी मी सर्वांचे आभारी असून यापुढेही मतदारसंघातील उर्वरित कामासाठी निधी मिळावा म्हणून पाठपुरावा करीत राहणार आहे मतदार संघातील रस्ते मजबूतीकरणासाठी  व पुलांच्या बांधकामासाठी पहिल्यांदाच  इतका मोठ्या प्रमाणात  निधी मिळाल्याने पुलांची व रस्त्याची कामे दर्जेदार होणार असल्याने या भागातील सर्व नागरिकामध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Pages