मंगळवेढ्यातील सर्व शाळांना सुट्टी व आठवडा बाजार 31 मार्चपर्यंत बंद :- मुख्याधिकारी पल्लवी पाटील - Divyaprabhat News

Breaking News

Sunday, March 15, 2020

मंगळवेढ्यातील सर्व शाळांना सुट्टी व आठवडा बाजार 31 मार्चपर्यंत बंद :- मुख्याधिकारी पल्लवी पाटील मंगळवेढा/प्रतिनिधी 
           मंगळवेढा शहरातील सर्व शाळा व महाविद्यालय तसेच शहरामध्ये दर सोमवारी भरणारा आठवडा बाजार दि.31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येत असल्याची माहिती मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
       दरम्यानच्या काळात मंगळवेढा शहरातील सर्व सभा,मेळावे,सामाजिक कार्यक्रम,जत्रा,यात्रा, उरुस,धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम,क्रिडा स्पर्धा , अंगणवाडी,क्लासेस,सिनेमा गृहे,शॉपिंग मॉल्स, व्यायामशाळा,तसेच गर्दी होणा - या इतर कार्यक्रमांना दि. 31 मार्च 2020 अखेर बंदी आहे.
            नागरीकांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी थुकू नये , खोकताना , शिंकताना नाकावर व तोंडावर रूमाल धरावा वारंवार आपले हात साबन व पाणी वापरून स्वच्छ धुवावेत . गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे कोरोना विषाणु विषयक कोणत्याही अफवा पसरवू नये सर्दी किंवा फ्ल्यू सारखी लक्षणे आढळल्यास ग्रामीण रूग्णालयाशी संपर्क साधावा.
           
मंगळवेढा शहरात जत्रा,यात्रा,उरुस व इतर धार्मिक व सामाजिक कार्यक्रमामधील विधीवत पुजा करण्यास व परंपरेने करावयाचे कार्यक्रम मोजक्या लोकांच्या उपस्थितीत करण्यास बंदी असणार नाही. तसेच कौटुंबीक स्वरुपात करणेत येणारे कार्यक्रमावर बंदी असणार नाही परंतु या दोन्ही बाबतीत सर्व वैद्यकिय सुरक्षा बाळगणे बंधनकारक राहील.यासाठी मुख्याधिकारी नगरपरिषद मंगळवेढा यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असून या आदेशाचे उल्लंघन करुन अशा गर्दीचे कार्यक्रम आयोजित केल्यास संबंधित संयोजकाविरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1965 चे कलम 43 अन्वये कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

Pages