सावित्रीबाई फुले यांचा वारसा चालविण्याची सर्व जबाबदारी मुलींनी घ्यावी :- नगराध्यक्षा अरूणाताई माळी... - Divyaprabhat News

Breaking News

Friday, January 3, 2020

सावित्रीबाई फुले यांचा वारसा चालविण्याची सर्व जबाबदारी मुलींनी घ्यावी :- नगराध्यक्षा अरूणाताई माळी...


मंगळवेढा/प्रतिनिधी

          सावित्रीबाई फुले यांचा वारसा चालविण्याची सर्व जबाबदारी शाळेतील शिक्षण घेणाऱ्या सर्व मुलीनी घ्यावी असे मत मंगळवेढा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ.अरुणाताई माळी यांनी एक कानमंञ दिला.मातृत्वाचे दर्पण घेऊन जिचा जन्म झाला, संपूर्ण जनतेला स्वतःच्या नावाची लेखी ओळख जिने करून दिली ‘चूल आणि मूल’ या संकल्पनेतून  महिलांना बाजूला काढून त्यांना स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव ज्यांनी करून दिली, त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून यश खेचून आणण्याची तयारी ठेवावी असे त्यां यावेळी बोलताना म्हणाल्या यावेळी मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापती प्रेरणाताई मासाळ यांनी सावित्रीबाई फुले यांचा कार्य तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी मुलींनी सज्ज रहावे असे प्रतिपादन केले.
              श्री.कामसिध्द विद्यालय खुपसंगी येथे आयोजित केलेल्या तालुकास्तरीय किशोरी हितगुज मेळाव्यास मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद शाळा खुपसंगीची विद्यार्थिनी धनश्री संतोष वाले होती.प्रमुख पाहुणे म्हणून ढवळस जि.प.शाळेची विद्यार्थिनी वैभवी हेंबाडे तर उद्घाटनप्रसंगी प्रास्ताविक गटशिक्षण धिकारी पोपट लवटे यांनी केले
तर शिक्षण विभागातर्फे मुलींच्या शिक्षणासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात याविषयीची सविस्तर माहिती लवटे यांनी दिली उद्घाटन प्रसंगी दत्तात्रय येडवे व संजय बिदरकर यांनी स्त्री शिक्षणाचा पोवाडा सादर केला धनसिंग चव्हाण यांनी सकाळच्या सत्रात योगासने व मुक्त हालचाली यांचा अतिशय चांगला सराव घेतला या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्या मंजुळा कोळेकर,माजी सभापती प्रदीप खांडेकर, सुधाकर मासाळ,पाटकळच्या सरपंच उषाताई बिले, मुख्याध्यापक तुकाराम मेटकरी यांनी शुभेच्छा दिल्या व विस्तार अधिकारी बजरंग पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रप्रमुख गोपाळ हेंबाडे , भारत हेंबाडे, पुरुषोत्तम राठोड , रामचंद्र पाटील , हिरालाल कोंडुभैरी, श्रीमंत पाटील लिंबू चमचा व धावणे , पोस्टर स्पर्धा , चित्रकला , रांगोळी , सांस्कृतिक कार्यक्रम, इत्यादी स्पर्धा पार पाडल्या विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगल बनसोडे व सुषमा सुतार यांनी केले व प्रारंभी मुख्याध्यापक तुकाराम मेटकरी यांनी प्रशालेच्या वतीने सर्वांचे आभार मानले.

Pages