रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहुल शहा यांचा मनमानी, कारभाराच्या चौकशीसाठी जेष्ठ संचालक जोशी यांचे दि.26 रोजी धरणे आंदोलन - Divyaprabhat News

Breaking News

Saturday, January 4, 2020

रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहुल शहा यांचा मनमानी, कारभाराच्या चौकशीसाठी जेष्ठ संचालक जोशी यांचे दि.26 रोजी धरणे आंदोलन


 मंगळवेढा/प्रतिनिधी

         मंगळवेढा येथील रतनचंद शहा सहकारी बैंकेचे चेअरमन  राहुल शहा यांच्या  मनमानी व हुकुम शाही  कारभाराची चौकशी करण्याची मागणी  जेष्ठ संचालक अँड. रमेश जोशी यांनी रिजर्व बँकेकडे केली असून गेल्या वर्षभरापासून बँकेकडे 45 वेळा विविध माहिती मागवूनही दिली गेली नाही त्यामुळे या भ्रष्ट व मनमानी करभाराबाबत  येत्या 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी बँकेच्या समोर विविध मागण्यांसाठी धरणे  आंदोलन करणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकार्याना दिले असल्याची माहिती अँड.जोशी यांनी दिली. 

मंगळवेढा  सारख्या दुष्काळी तालुक्यातील शेतकरी, व्यापारी, सर्वसामान्य यांना आर्थिक मदत होण्याच्या  हेतूने स्व.रतनचंद शहा यांनी मंगळवेढा अर्बन बँकेची स्थापना करून  संस्था नावारूपाला आणली परंतु त्यांचे पश्चात त्यांचे नातू व विद्यमान चेअरमन राहुल शहा हे गेल्या अनेक दिवसांपासून संस्थे मध्ये कर्मचाऱयांच्या बेकायदेशीर प्रमोशन, बदल्या, बेकायदेशीर नेमणुका, संचालकांना विश्वासात न घेणे, खर्चाचे हिशोब न दाखविणे, प्रोसिडिंग न दाखविणे, माहिती न देणे, असा अनागोंदी कारभार करीत आहेत  सतत तीन वर्षे पाठपुरावा करून वारंवार बैंकेचा कारभार सुधारावा म्हणून वेळोवळी सुचना देऊनही प्रगती दिसत नसल्याने व जाणीव पुर्वक दुर्लक्ष करीत आहेत एक वर्षापासून 45 लेखी अर्ज / पत्रे देऊनही  कारभाराबाबत माहिती दिली जात नाही  व त्याची दखल न घेता मनमानी कारभार सुरू ठेवला जात आहे                   
            त्यामुळे या कारभाराची चौकशी होण्यासाठी  रिजर्व बँक,सहकार आयुक्त, सहकारमंत्री, जिल्हाधिकारी जिल्हा निबंधक यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत  तालुक्याच्या विकासात हातभार लागलेली संस्था टिकावी व रतनचंद शहा यांनी लावलेले सहकाराचे रोपटे बुडू नये यासाठी तक्रारी वरिष्ठांकडे पाठविण्यात आल्या आहेत. जिल्हा उपनिबंधक सोलापूर व  सहकार आयुक्त पुणे यांच्या आदेशालाही बैंकेकडुन केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे विविध मागण्यांसाठी 26 जानेवारी रोजी अँड.रमेश जोशी हे धरणे आंदोलन करणार आहेत जोशी हे रतनचंद शहा यांचे निष्ठावंत कार्यकर्ते होते परंतु त्यांच्या काळात देखील जोशी यांनी संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे परतु विद्यमान अध्यक्ष यांच्या मनमानी कारभाराबाबत जोशी यांनी  तक्रारी व धरणे आंदोलनाची नोटीस दिल्याने येथील सहकार क्षेत्रात मोठ्याप्रमाणात खळबळ उडाली आहे

Pages