खेळामुळे शरीराला व आयुष्याला ही शिस्त लागते :- किरण अवचर - Divyaprabhat News

Breaking News

Saturday, January 4, 2020

खेळामुळे शरीराला व आयुष्याला ही शिस्त लागते :- किरण अवचर


पंढरपूर/प्रतिनिधी 
           विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच खेळाची ही कला आत्मसात केली पाहिजे खेळामुळे विद्यार्थ्यांच्या शरीरासह आयुष्यालाही शिस्त लागते. त्यामुळे यश पब्लिक स्कूल च्या वतीने राबविण्यात आलेला  क्रीडा महोत्सव कौतुकास्पद आहे.  असे प्रतिपादन पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी केले.
              पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथील यश पब्लिक स्कूलच्या आयोजित क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी अवचर बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कुर्मदास साखर कारखान्याचे संचालक व संस्थेचे सचिव राहुल  पाटील, संस्थेच्या अध्यक्ष सौ प्रगती दशरत पाटील ,मुख्याध्यापक सचिन लोखंडे, आदी उपस्थित होते .
              पुढे बोलताना अवचर म्हणाले की , विद्यार्थ्यांच्या ज्ञानाबरोबरच त्यांच्या कलागुणांना ही वाव मिळाला पाहिजे. म्हणून शाळेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी विविध  स्पर्धांमधून यश मिळवताना दिसून येत आहे .यश पब्लिक स्कूल मध्येही अशाच प्रकारचे विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याने हे उपक्रम कौतुकास्पद आहेत. 
           यावेळी पोलीस अधिकारी अवचर यांच्या हस्ते क्रीडा महोत्सवातील कबड्डी खोखो अशा विविध स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले. आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी  शिक्षक सत्यवान लोखंडे ,आनंद उबरदंडे,  शिक्षिका वृषाली कुंभार,अंजली देशमुख, भारती वराडे ,अश्विनी जानकर, विद्या सांजुरे, अमृता शिंदे पल्लवी डुबल ,कल्याण म्हसवडे,  श्रेया कुलकर्णी,अर्जुन पाटोळे यांचेसह पालक व विद्यार्थी उपस्थित होते हा क्रीडा महोत्सव यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक सचिन लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्कूल मधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले तर हा क्रीडा महोत्सव यशस्वी केल्याबद्दल संस्थेचे मार्गदर्शक पोलीस अधिकारी दशरथ पाटील यांनी शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Pages