पाटकळ येथे श्री काळभैरव सिद्धनाथ व जोगेश्वरी देवांची मुर्तीस्थापना.. - Divyaprabhat News

Breaking News

Wednesday, December 11, 2019

पाटकळ येथे श्री काळभैरव सिद्धनाथ व जोगेश्वरी देवांची मुर्तीस्थापना..

मंगळवेढा/प्रतिनिधी 

        पाठकळ ता मंगळवेढा येथील ग्रामदैवत श्री काळभैरव सिद्धनाथ व जोगेश्वरी या देवांच्या जुन्या मुर्तींच्या ठिकाणी नवीन मुर्तींची प्राण प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. त्यानिमित्त गुरुवार दिनांक 12 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता गजी ढोलाच्या तालावर पावड धरला जातो व सिध्दनाथाच्या नावाने चांगभले असा जयघोष करीत गुलाल,खोबऱ्याची उधळण करून भव्य अशी पाटकळ नगरीतुन मिरवणुक निघुन मंदिराकडे प्रस्थान होणार आहे.
           शुक्रवार दिनांक 13 डिसेंबर रोजी सकाळी सात ते दुपारी दोन या वेळेत विधीवत होम,पुजा होऊन मुर्ती स्थापना करण्यात येणार आहे.त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होऊन मुर्तीस्थापना कार्यक्रमाची सांगता होणार आहे. तरी भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने मुर्ती स्थापनेसाठी उपस्थित रहावे असे आवाहन पाटकळ ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलेले आहे.

Pages