जप्त वाळू साठ्याचा लिलाव... - Divyaprabhat News

Breaking News

Wednesday, December 11, 2019

जप्त वाळू साठ्याचा लिलाव...           पंढरपूर/प्रतिनिधी
       जप्त केलेल्या अवैध वाळू साठ्याचा लिलाव सोमवार दिनांक 16 डिसेंबर 2019 रोजी दुपारी 12.00 वाजता  तहसिल कार्यालय, पंढरपूर येथे आयोजित केला असल्याची माहिती तहसिलदार डॉ.वैशाली वाघमारे यांनी दिली आहे.
            पंढरपूर तालुक्यात महसूल प्रशासनाने अवैध वाळू साठे व वाळू वाहतुकीवर केलेल्या कारवाईत सुमारे  40  ब्रास वाळू जप्त केली असून, हा वाळू  शासकीय धान्य गोदाम, पंढरपूर येथे वाळू साठा ठेवण्यात आला आहे. या  ठिकाणच्या वाळू साठ्याची किंमत सुमारे दोन  लाख 80 हजार  रुपये  इतकी आहे. ज्या कोणास वाळू लिलावात भाग घ्यावावयाचा अशा व्यक्तींनी  संबधीत ठिकाणच्या वाळू साठ्याची पाहणी करावी. तसेच लिलावात भाग घेण्यासाठी  दिनांक 13 डिसेंबर 2019 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत  लेखी अर्ज तहसिल कार्यालय, पंढरपूर यांच्याकडे सादर करावेत असेही तहसिलदार वाघमारे यांनी सांगितले.
            लिलावातील सर्वोत्तम बोलीची रक्कम तात्काळ त्याच दिवशी शासकीय खजिन्यात चलनाव्दारे जमा करावी.तसेच स्वत:कडील वाहनाव्दारे संबधीत ठिकाणावरुन वाळू घेवून जावी. लिलावात भाग घेण्या-या व्यक्तींनी नमुद ठिकाणी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहनही तहसिलदार वाघमारे यांनी केले आहे. 

Pages