मी आमदार म्हणून नाही तर सेवक म्हणून काम करणारा - आ.शहाजीबापू पाटील - Divyaprabhat News

Breaking News

Tuesday, December 10, 2019

मी आमदार म्हणून नाही तर सेवक म्हणून काम करणारा - आ.शहाजीबापू पाटील




   पंढरपूर/प्रतिनिधी 
      रघुनाथ पवार

      सांगोल्याचे नूतन आमदार शहाजीबापू पाटील हे सोमवार पासून गावभेट दौऱ्यावर असून दुसर्‍या दिवशी खेडभाळवणी, भंडीशेगाव , शेळवे व इतर गावांच्या गाव भेट दौऱ्यावर होते. त्यांच्यासोबत माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील भाऊसाहेब रुपनर उपस्थित असून त्यांचे खेडभाळवणीत  स्वागत व सत्कार करण्यात आला.
            सांगोला मतदारसंघात यावर्षी चुरशीची निवडणूक होऊन निर्णायक मतावर शहाजीबापू पाटील विजयी झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिपक आबा साळुंखे यांचे नाव मतपत्रिकेवर असून सुद्धा शुन्य मते घेऊन मला पाठिंबा दिला आहे दिपक आबांच्या  याच  धाडसामुळे व भाऊसाहेब रूपनर यांनी मतांची मोठी ताकत माझ्या मागे उभी केली म्हणून मी निवडून आलो असे शब्दात शहाजी बापू यांनी भावना व्यक्त केल्या .
       
 गाव भेट दौराला उशीर झाल्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो व खेडभाळवणीची व माझी जन्मापासूनची नाळ जोडलेली असून खेडभाळवणीकरांनी रस्ता  , पाणी , विज व कोणते काम असेल तर सांगा ते मी लवकरात लवकर सोडून मी आमदार म्हणून नाही तर सेवक म्हणून काम करेल असे आश्वासन शहाजीबापू पाटील यांनी मतदारांना दिले यावेळी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने आपले प्रश्न निवेदनाद्वारे शहाजी बापूंकडे देण्यात आले .
      यावेळी भीमा नदीवरील बंधारे पंचगंगा नदी प्रमाणे कॉन्स्टंट पद्धतीने भरून ठेवण्यासाठी सिस्टीम राबवण्यासाठी शहाजी बापूंनी विधानसभेत प्रश्न मांडण्यासाठी मी मदत करणार असे दीपक आबा साळुंखे यांनी सांगितले खेडभाळवणीत स्वागतासाठी  बिबिषण पवार ,  आर.डी .पवार , ज्ञानोबा पवार ,नवनाथ पवार , मच्छिंद्र पवार, पोपट घालमे व राष्ट्रवादी ,  शिवसेनेचे कार्यकर्ते , ग्रामस्थ  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Pages