आयुष्यात ध्येय निश्चित करून जिद्दीने पाठलाग करा :- प्राजक्ता गायकवाड - Divyaprabhat News

Breaking News

Monday, December 30, 2019

आयुष्यात ध्येय निश्चित करून जिद्दीने पाठलाग करा :- प्राजक्ता गायकवाडमंगळवेढा/प्रतिनिधी
            महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारताना लाठीकाठी ढाल-तलवार  घोडेस्वारी याचे प्रशिक्षण घेतले यात एक गोष्ट नक्की आहे आयुष्यात ध्येय ठरवा व जिद्दीने वाटचाल करा यश तुमच्या पासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही असे प्रतिपादन येसूबाई फेम प्राजक्ता गायकवाड यांनी केले त्या
             दलित मित्र कदम गुरुजी शास्त्र व कला महाविद्यालय शिवतेज प्राथमिक शाळा इंग्लिश स्कूल माध्यमिक उच्च माध्यमिक तन्त्र युक्त विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विविध कला गुणदर्शन वार्षिक स्नेहसंमेलनाच्या पारितोषिक वितरण समारंभाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने इंग्लिश स्कूल मधील यशवंत पटांगणावर रविवारी झालेल्या या कार्यक्रमात त्या बोलत होत्या
         यावेळी व्यासपीठावर  संस्थेचे अध्यक्ष अँड़.सुजित कदम उपाध्यक्ष बी टी पाटील दलित मित्र कदम गुरुजी शास्त्र कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष कदम सहसचिव श्रीधर भोसले अजीता भोसले जकराया शुगर चे चेअरमन बीराप्पा जाधव यतीराज वाकळे संस्थेच्या प्रशासकीय प्रमुख डॉ.मीनाक्षी कदम उपप्राचार्य तेजस्विनी कदम माजी प्राचार्य किसन डांगे लक्ष्मण माने जयराम आलदर कल्याण भोसले यासह प्रशालेचे पर्यवेक्षक शिक्षक शिक्षकेतर विद्यार्थी विद्यार्थिनी प्रतिनिधी शिवतेज प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका व आदी मान्यवर उपस्थित होते
            यावेळी पुढे बोलताना गायकवाड यांनी महाराणी येसूबाई जगासमोर दाखवणे कठीण कार्य त्यांचा इतिहास दैदिप्यमान आहे डॉ.अमोल कोल्हे यांनी छत्रपती संभाजी महाराज जगाला समजावले चुकीच्या इतिहासामुळे लोकांत गैरसमज निर्माण झाले होते स्वाभिमान अभिमान देशाभिमान पराक्रम हे सगळं जगात जर कुणाकडून  अनुभवायला मिळत तर ते फक्त संभाजी महाराजांकडून


             औरंगजेब यांच्या सोबत दोन हात करत साडेआठ वर्षे येथे एक ही किल्ला जिंकू न देणारा पराक्रमी संभाजी महाराज होतेअभिनय व तंत्रशिक्षण या दोन्ही गोष्टी एका वेळी अनुभवत आहे एखाद्या क्षेत्राची आवड असेल तर सवड मिळते असे सांगत त्यांनी साडेतीनशे वर्षापूर्वी न्यायदान करण्याची पद्धती खूप ताकदीच्या होत्या. असे मत व्यक्त केले पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या प्रशासकीय प्रमुख डॉ.मीनाक्षीताई कदम होत्या अध्यक्षीय मनोगतात त्यांनी संस्थेच्या 65 वर्षाच्या उज्ज्वल परंपरेची माहिती देत ब्रह्मपुरी येथे येसूबाई या तीन वर्षे नजरकैदेत होत्या या ऐतिहासिक आठवणींना उजाळा दिला.
            परितोषिक वितरण समारंभाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या सचिव प्रियदर्शनी महाडिक यांनी केले यावेळी त्यांनी स्वर्गीय दलित मित्र कदम गुरुजी यांनी शैक्षणिक संस्थेच्या उभारणीसाठी दिलेल्या योगदानाची माहिती दिली अपयशाने खचून न जाता स्पर्धेत उतरण्यासाठी मोठे कष्ट घ्या असा संदेश त्यांनी यावेळी दिला.दलित मित्र कदम गुरुजी शास्त्र व कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष कदम यांनी अहवाल वाचन केले
             इंग्लिश स्कूल प्रशालेचे अहवाल वाचन प्राचार्य शिवाजीराव चव्हाण यांनी केले या अहवालात त्यांनी इंग्लिश स्कूल शाळेचे वर्षभरातील सर्व धडपडी क्रीडाप्रकार गुणवत्ता यादीतील विद्यार्थी यासह विविध स्पर्धेत चमकदार कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांची माहिती सुरेख पद्धतीने मांडली माध्यमिक चे पारितोषिक वितरण अहवालाचे वाचन आमीन मुलाणी यांनी केली तर जुनियर कॉलेज चे अहवाल वाचन प्रा.अमजद खतीब यांनी केले.
            माध्यमिक विद्यार्थी प्रतिनिधी सुतार व जगताप यांनी विविध शाळेतून आलेल्या शुभ संदेशाचे वाचन केले.कलाशिक्षक शितल कापसे व राजेश पवार यांनी सिनेतारका प्राजक्ता गायकवाड यांचे काढलेले चित्र यावेळी प्रकाशित करण्यात आले.कार्यक्रमांच्या पाहुण्यांचा परिचय पर्यवेक्षक सुनिल नागणे यांनी केला.सूत्रसंचालन बालाजी शिंदे आणि व्यंकटेश साठे यांनी केले तर आभार प्रा.शिवाजी बंडगर यांनी मानले.


Pages