मंगळवेढा तालुक्यातील जप्त वाळू साठ्याचा लिला... - Divyaprabhat News

Breaking News

Sunday, December 29, 2019

मंगळवेढा तालुक्यातील जप्त वाळू साठ्याचा लिला...


 पंढरपूर/प्रतिनिधी

      मंगळवेढा  तालुक्यातील मौजे सिध्दापूर हद्दीत जप्त केलेल्या अवैध वाळू साठ्याचा लिलाव मंगळवार दिनांक 07 जानेवारी  2020 रोजी सकाळी 11.00 वाजता  उपविभागीय  कार्यालय, मंगळवेढा  येथे आयोजित केला असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली आहे.
            मंगळवेढा-मोहोळ तालुक्यातील मौजे मिरी-सिध्दापूर येथील प्रस्तावीक संयुक्त वाळू ठेक्याच्या लिलावातील शिल्लक असलेल्या मौजे सिध्दापूर हद्दीतील भीमा नदी पात्रामधील   महसूल प्रशासनाने वाळू साठ्यावर केलेल्या कारवाईत सुमारे  4 हजार 644.84   ब्रास वाळू साठा जप्त केला आहे.  हा वाळू  साठा मौजे सिध्दापूर हद्दीतील भीमा नदी पात्रालगत गट नं.3 येथे   ठेवण्यात आला आहे. या  ठिकाणच्या वाळू साठ्याची किंमत  सुमारे तीन कोटी 25  लाख 13 हजार 880  रुपये  इतकी आहे. ज्या कोणास वाळू लिलावात भाग घ्यावावयाचा अशा व्यक्तींनी  संबधीत ठिकाणच्या वाळू साठ्याची पाहणी करावी असे उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी सांगितले.

           लिलावात भाग घेण्यासाठी  आयकर भरत असल्याचा पुरावा , पॅन नंबर अथवा विक्रीकर विभागाचा टॅन क्रमांक आवश्यक आहे. मंगळवार दिनांक 07 जानेवारी 2020 पुर्वी  निवीदा अर्जाचे विनापरतावा शुल्क  दोन हजार रुपये रोखीने भरावेत तसेच एकूण सरासरी किंमतीच्या  20 टक्के रक्क्म रुपये 65 लाख 2 हजार 776 रोखीने भरावेत. लिलावातील सर्वोत्तम बोलीची रक्कम तात्काळ त्याच दिवशी भारतीय स्टेट बँक शाखा मंगळवेढा येथे चलनाव्दारे जमा करावी.तसेच स्वत:कडील वाहनाव्दारे संबधीत ठिकाणावरुन वाळू घेवून जावी. लिलावात भाग घेण्या-या व्यक्तींनी नमुद ठिकाणी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहनही उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी केले आहे. 

Pages