नागरीकांना आवश्यक आरोग्य सोयी सुविधा पुरवाव्यात-आ.भारत भालके - Divyaprabhat News

Breaking News

Friday, December 27, 2019

नागरीकांना आवश्यक आरोग्य सोयी सुविधा पुरवाव्यात-आ.भारत भालके



पंढरपूर/प्रतिनिधी
           शासनाच्या आरोग्य योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरीकांना आवश्यक सोयी सुविधा पुरवाव्यात अशा सूचना आमदार भारत भालके यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिल्या.
 
          आरोग्य विभागामार्फत नागरीकांना देण्यात येणाऱ्या सोयी- सुविधांच्या बाबत शासकीय  विश्रामगृह पंढरपूर येथे बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीस प्रांतधिकारी सचिन ढोले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रदिप ढेले, उपजिल्‍हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ.जयश्री ढवळे, न.पा.चे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुंजकर, मंदीर समिती सदस्य संभाजी शिंदे, मा.नगरसेवक राहुल साबळे, उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर यांच्यासह संबंधित अधिकारी  व पदाधिकारी उपस्थित होते.
            यावेळी आमदार भारत भालके बोलताना म्हणाले, उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे पंढरपूर तालुक्यासह मंगळवेढा, सांगोला तालुक्यातील सामान्य नागरीक उपचारासाठी येतात. तसेच पंढरपूर येथे यात्रा कालावधीत मोठया प्रमाणात भाविक येत असतात. येणाऱ्या नागरीकांना व भाविकांना  आरोग्य विभागाच्या आवश्यक सुविधा पुरवाव्यात. तसेच सिटी स्कॅन मशिन कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. आय.सी.यु सेंटर मध्ये रुग्णांना आवश्यक सुविधा द्याव्यात. रुग्णालयांत मुबलक औषधाचा साठा उपलब्ध करावा, रुग्णवाहिका सुस्थित ठेवाव्यात, रुग्णांना आावश्यक  माहिती देण्यासाठी स्वागत कक्ष सुरु ठेवावा. रुग्णालयाच्या परिसराची स्वच्छता ठेवावी. पोलीस विभागामार्फत सुरक्षेसाठी आवश्यक बंदोबस्त ठेवावा. महावितरण विभागाने रुग्णालयास अखंडीत वीज पुरवाठा करावा. नगर पालिकेने उपजिल्हा रुग्णालयास तात्काळ पिण्याचा पाणी पुरवठा सुरु करण्याबाबत कार्यवाही करावी अशा सुचनाही आमदार भालके यांनी बैठकीत दिल्या.
            यावेळी  जिल्हा शल्यचिकित्सक प्रदिप ढेले यांनी  आरोग्य विभागामार्फत रुग्णांना देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती दिली.

Pages