पंढरपूर येथे वन अधिकारी व कर्मचारी यांची कार्यशाळा संपन्न.. - Divyaprabhat News

Breaking News

Saturday, November 16, 2019

पंढरपूर येथे वन अधिकारी व कर्मचारी यांची कार्यशाळा संपन्न..पंढरपूर/प्रतिनिधी 

 जिल्ह्यातील वनविभागातील अधिकारी व कर्मचारी यांची व्यक्तिमत्व विकास , संवाद  कौशल्य व कार्यक्षमता वाढ आदी विविध विषयावर शनैश्वर मठ, पंढरपूर येथे दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली.
या कार्यशाळेचे उद्घाटन उपवन संरक्षक प्रविणकुमार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व वृक्ष पूजनाने करण्यात आले. यावेळी उद्घाटना प्रसंगी त्यांनी वनविभागातील अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेस सहाय्यक वनसंरक्षक जी.एस.साबळे, आर.एन.नागटिळक, वनपरिक्षेत्र अधिकारी विलास पवळे, आय.ए.एच शेख, श्रीमती जयश्री पवार , कोकाटे तसेच विजय साठे   आदी उपस्थित होते.

या कार्यशाळेत प्रमुख वक्ते ॲड. गणेश हलकारे व नितीन राऊत यांनी व्यक्तिमत्व विकास, संवाद कौशल्य, कार्यक्षमता वाढ, माहिती अधिकार अधिनियम-2005, सेवा हमी कायदा, अभिलेख संवर्धन व जतन या विषयावर  संबंधितअधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन केले.
 कार्यशाळेस वन विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  सदर कार्यशाळेसाठी  वनपाल श्रीमती पत्की, ए.डी. बुरुंगले, वनरक्षक श्री.कळसाईत, श्री.माळी, श्री.दिघे, विजय देशपांडे, महादेव चव्हाण, बाळू पिसे, महेश पाटील  यांनी परिश्रम घेतले.

Pages