पोलिसांच्या नातेवाइकांचे वाहन असल्याची गोरक्षकांची तक्रार,पोलिस अधिक्षकांनी लक्ष घालण्याची गरज.... - Divyaprabhat News

Breaking News

Sunday, November 17, 2019

पोलिसांच्या नातेवाइकांचे वाहन असल्याची गोरक्षकांची तक्रार,पोलिस अधिक्षकांनी लक्ष घालण्याची गरज....


मंगळवेढा/प्रतिनि
          मंगळवेढयातून अवैधरित्या जनावरे वाहतूक करणारा जनावरांचा टेंपो पोलिसांच्या नातेवाईकांचा असल्यामुळे कारवाई न करता शनिवारी मध्यरात्री सोडून देण्याचा प्रकार मंगळवेढा पोलिसांकडून घडला असून जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांनी चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे शनिवारी मध्यरात्री कर्नाटक राज्याकडे जाणार्‍या  एका टेंपोत दाटीवाटीने खिलार गाई भरून दाव्याने करकचून बांधून जात असल्याची माहिती तहसीलदार यांना समजली. तहसीलदार यांनी याबाबत पोलिसांना चौकशी करण्याचे पोलिसांना कळविले.  या वाहनामध्ये दाटीवाटीने जवळपास चार खिलार गायी व एक खोंड असे दाव्याने करकचून बांधण्यात आले होते.                           तहसीलदारांनी कळविताच पोलिस हवालदार कोळी व पोलिस नाईक बापू पवार  हे मरवडे मार्गावरील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ जावून त्यांनी सदर जनावरे घेवून जाणार्‍या जनावरांची चौकशी केली. व त्यांनी ही जनावरे कर्नाटकातील मौजे टाकळी,ता.इंडी.जि.सोलापूर येथे ऊस तोडणीसाठी कामगार घेवून जात असल्याची नोंद स्टेशन डायरीला घेतली आहे.टेंपोतील या जनावरांची हाल अपेष्टा झाल्याची तक्रार गोरक्षकांची आहे. तहसीलदार यांनी कळवूनही पोलिसांच्या नातेवाईकांचा वाहतुक करणारी जनावरे व वाहन असल्यामुळे पोलिसांनी कुठलीही कारवाई न करता केवळ स्टेशन डायरीला नोंद करून पोलिसांच्या नातेवाईकांना वाचविण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा शनिवारी दिवसभर मंगळवेढा शहरातून होत होती.
             या वाहनाला जनावरांची वाहतूक करण्याचा कुठलाही परवाना नसल्याचे तसेच ही जनावरे कर्नाटक राज्यात  कत्तलखान्याकडे जात असल्याचा आरोप गोरक्षकांचा आहे.

Pages