सोलापूर रेल्वे चाईल्ड हेल्प डेक्सतर्फे बाल दिन मोठ्या उत्साहात साजरा... - Divyaprabhat News

Breaking News

Friday, November 15, 2019

सोलापूर रेल्वे चाईल्ड हेल्प डेक्सतर्फे बाल दिन मोठ्या उत्साहात साजरा...


सोलापूर/प्रतिनिधी
                भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस हा भारतामध्ये बालदिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो, त्याच अनुषंगाने सोलापूर जिल्हा सामाजिक कार्य समिती संचलित रेल्वे चाईल्ड हेल्प डेक्सतर्फे  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा महिला बाल समितीचे अधिकारी डॉ. विजय खोमणे व जिल्हा बाल समितीच्या अध्यक्षा अनुजा कुलकर्णी यांच्या हस्ते झाले.
              या कार्यक्रमाप्रसंगी लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जी.के. राठोड, पोलीस उपनिरीक्षक वाघमारे, रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक राकेश कुमार, बाल संरक्षण अधिकारी विजय मत्तुर, विधी सल्लागार कुटे, सोलापूर जिल्हा सामाजिक समितीच्या संचालिका सपना चिट्टे, टिकीट इन्चार्ज गायकवाड, प्रांजल ताटे, अशिफ शेख, मठपती, शिवशरण, रेल्वे चाईल्ड हेल्प डेक्सचे मल्लिनाथ तमशेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती.
            प्रास्ताविकेत डॉ. खोमणे यांनी बालकांविषयी असलेले कायदे याची माहिती दिली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तमशेट्टी यांनी केले तर आभार चाईल्ड हेल्प डेक्सचे समुपदेशक शशिकांत चव्हाण यांनी मानले तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनोज कदम, योगेश सुतार, प्रशांत वाघमारे, विश्वेश्वर वाघमारे, ऊर्मिला बनसोडे, वैशाली बाळशंकर, गुरू भाईकट्टी आणि प्रसाद स्वामी यांनी परिश्रम घेतले.

Pages