कार्तिकी यात्रा कालावधीत स्वच्छतेचे नियोजन प्रांतधिकारी:- सचिन ढोले - Divyaprabhat News

Breaking News

Friday, November 1, 2019

कार्तिकी यात्रा कालावधीत स्वच्छतेचे नियोजन प्रांतधिकारी:- सचिन ढोले


पंढरपूर/प्रतिनिधी

 सतत पडणारा पाऊस व धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गामुळे चंद्रभागेच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी असल्याने, भाविकांची संख्या 65 एकर परिसरात जास्त होणार आहे. याबाबत सर्व संबंधित विभागांनी स्वच्छतेचे काटेकोर नियोजन करावे. स्वच्छता चांगली राहिली या दृष्टीने सर्व विभागांनी प्रयत्न करावेत. अशा सूचना प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिल्या.
कार्तिकी यात्रेत करावयाची कामे आणि नियोजन याबाबतचा आढावा प्रांतकार्यालय, सांस्कृतीक भवन येथे घेण्यात आला यावेळी ते बोलत होते. यावेळी बैठकीस मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, तहसीलदार डॉ.वैशाली वाघमारे, न.पाचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, पोलीस निरीक्षक दयानंद गावडे ,किरण अवचर , मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड  व संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
              प्रांताधिकारी ढोले बैठकीत बोलताना म्हणाले , सध्या नदीपात्रात वाढत्या पावसामुळे पाणी जास्त आहे. तसेच येत्या काळात अधिकचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दृष्टीने संपूर्ण शहरात स्वच्छता रोगराई निवारणासाठी आरोग्य विभागाने सतर्क रहावे तसेच पुरेसा औषध साठा उपलब्ध करुन ठेवावा. यात्रेत  भाविकांना चांगल्या पद्धतीच्या आरोग्यसुविधा व औषध उपचार करण्याच्या दृष्टीने अधिक भर द्यावा.
       नगरपालिकेने शहरातील गर्दीचे ठिकाण निश्चित करुन तात्पुरत्या स्वरुपाचे शौचालय उपलब्धत करुन द्यावीत तसेच त्याठिकाणी पुरेसा पाणीपुरवठा करण्यात यावा. 65 एकर येथे भाविकांसाठी पिण्याचे पाणी, शौचालय, विद्युत पुरवठा तसेच वैद्यकीय सुविधा भाविकांना उपलब्ध करुन देण्याचे नियोजन करावे.

          कार्तिकी यात्रा कालावधीत शहरात 6  ठिकाणी आपत्कालीन मदत केंद्र उभारण्यात  येणार आहेत. या मदत केंद्रावर देखील वैद्यकीय सुविधा पोलीस मदत महसूल प्रशासनाच्या वतीने भाविकांच्या अडीअडचणी सोडवण्याचे काम करण्यात येणार आहे. शहर व मंदीर परिसर स्वच्छतेबाबत नगर पालिका आणि मंदिर समितीच्या माध्यमातून अतिरिक्त स्वच्छता कर्मचारी नेमूण स्वच्छता करण्याचे नियोजन करण्यात यावे. अशाही सूचना यावेळी प्रांतधिकारी ढोले यांनी  दिल्या.
          मंदिर समितीने भाविकांना सुरळीत दर्शन मिळावे  यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. यावेळी बैठकीत सावजनिक बांधकाम, दूरसंचार, वीज वितरण, पाटबंधारे विभाग, परिवहन विभागा आदी विभागांचा आढावा प्रांतधिकारी ढोले यांनी यावेळी घेतला.

Pages