पंढरीत साकारली विजयदुर्ग किल्याची प्रतिकृती... - Divyaprabhat News

Breaking News

Friday, November 1, 2019

पंढरीत साकारली विजयदुर्ग किल्याची प्रतिकृती...     पंढरपूर/प्रतिनिधी 

              दिवाळी सण आणि किल्ला यांचे नाते अतूट आणि जुने आहे. दिवाळीत बनवण्यात येणाऱ्या किल्ल्यांच्या प्रतिकृती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची आपल्याला साक्ष देतात.
         छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे शूर मावळे यांच्या शौर्याची साक्ष देणारे असे हे किल्ले दिवाळीत अनेक ठिकाणी बनवले जातात. दिवाळीत किल्ले बनवण्याची परंपरा फार पूर्वीपासूनची आहे. हीच परंपरा जपण्याचा प्रयत्न पंढरपुरातील दुर्गप्रेमी ज्ञानेश बोमलेकर  याने केलाय भुईदुर्ग आणि जलदुर्गाचे उत्तम मिश्रण असलेला  विजयदुर्ग  या किल्याची प्रतिकृती ज्ञानेश बोमलेकर याने या वर्षी  साकारली आहे. मराठा आरमाराच्या पराक्रमातील केंद्रबिंदू म्हणून विजयदुर्ग किल्ला मानला जातो .
      या विजयदुर्ग किल्ल्याविषयी माहिती  सांगताना ज्ञानेश बोमलेकर म्हणाले  की विजयदुर्ग हा किल्ला कोकण किनारपट्टीवरील शान आहे. नावाप्रमाणेच विजयी झेंडा फडकावणारा विजयदुर्ग म्हणजे जलदुर्गाचा बादशहाच मानला जातो इंग्रजांनाही त्या किल्ल्याची फार आस होती. इंग्रजांनी पेशव्यांच्या मदतीने आंग्रे यांचा पाडाव केला. तो किल्ला जिंकला. त्या वेळी त्यांनी पेशव्यांबरोबर तह असा केला, की विजयदुर्ग किल्ला त्यांच्याकडे राहील व त्या बदली बाणकोट व विजयदुर्गजवळची दहा गावे पेशव्यांना मिळतील. इंग्रज, पोतुगीज, डच इ. परकीय शत्रूंच्या तोफांचा महाभयंकर मारा खाऊनही आपल्या वास्तूचा एकही दगड ज्या किल्ल्याने जागचा हालू दिला नाही, असा मिश्रदुर्ग म्हणजेच विजयदुर्ग किल्ला आहे 

            या किल्याची प्रतिकृती साकारताना पाण्याच्या प्रचंड टाक्या, पिराची सदर, नगारखाना, खलबत खाना, साहेबाचे ओटे ,  दोन भुयारी मार्ग, गोमुख बांधणीचा दरवाजा, जिभी दरवाजा, यशवंत महाद्वार ,दिंडी दरवाजा , खलबतखाना, ‘सदर’ ,‘ खूब लढा तोफा बारा’  बुरूज, पेशवेकालीन वाड्याकडे जाणारे भुयार, भवानी मातेचे मंदिर, .बलभीम मारुतीचे मंदिर, सैनिकांची निवासस्थाने, पडकोट खुष्क’ , चुनखडी दलण्याचे रिंगण ,  तटबंदी, पाण्याचा हौद , धन्य कोठार ,  पाण्याखाली बांधलेली भिंत अशी किल्यावरील  पाह्ण्यासारखी  असलेली ठिकाणे  प्रतिकृतीत हुबेहूब साकारली आहेत.
         इतिहासकालिन पराक्रम आणि संघर्षाची गडकिल्ले प्रतिके आहेत. त्यांची आठवण सदोदित रहावी म्हणून सुटीच्या काळातली ही प्रथा जपत असताना गडकिल्ल्यांचा इतिहास आजच्या पिढीला समजावा त्यांचे दुर्गप्रेम जागृत व्हावे यासाठी २००८ पासून प्रतिवर्षी वेगेवेगळे किल्ले बनवीत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले, वेगवेगळ्या संस्थेमार्फत घेण्यात येणार असणाऱ्या भव्य किल्ले स्पर्धेत त्यांनी यश ही संपादन केले आहे .

          ज्ञानेश बोमलेकर याने साकारलेल्या विजयदुर्ग किल्ल्याची  प्रतिकृती पाहण्यास पंढरपुरातील अनेक दुर्गप्रेमी  गर्दी करीत आहेत. वेगळ्या शैलीने बनविलेल्या ज्ञानेशच्या  किल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
  

Pages