महालिंगराया व बिरोबा या गुरु-शिष्य भेटीचा सोहळा संपन्न... - Divyaprabhat News

Breaking News

Tuesday, October 29, 2019

महालिंगराया व बिरोबा या गुरु-शिष्य भेटीचा सोहळा संपन्न...मंगळवेढा/प्रतिनिधी

          महालिंगराया व बिरोबा या गुरु-शिष्य भेटीचा सोहळा ५ लाख भाविकांनी मोठ्या गजरात व जयघोषाने भंडार्‍याची उधळण करत आज दुपारी ४  च्या सुमारास हुलजंती येथे मोठ्या उत्साहात गुरु-शिष्याच्या भेटीचा सोहळा पार पडला.
कर्नाटक,आंध्रप्रदेश,महाराष्ट्र या राज्यातून भाविक लाखोच्या संखेने येथे आले होते. या सोहळ्याचे वैशिठे म्हणजे अमावसाच्या रात्री स्वता शंकर पार्वती हे महालिंगराया मंदिराच्या कलसाला मुंडास गुंडाळून जातात.त्याला ध्वज असे म्हंटले जाते.अशी भाविकांची श्रध्दा आहे.यावर्षी मुंडास कळसाच्या चारही बाजूला समान सोडलेले आहे.त्यामुळे महाराष्ट्र व कर्नाटक मध्ये पीक पाणी समान राहील अशी पूजर्‍यांची धारणा आहे.
हुन्नूरचा बिरोबा व हुलजंतीचा महालिंगराया यांच्या भेटीचा सोहळा पाहण्यासाठी लाखांहून अधिक भाविकांनी हजेरी लावली होती.या भेटीदरम्यान भाविकांनी भंडारा व लोकराची मनसोक्त उधळण केली.चडचण,सोड्डी,मंगळवेढा मार्गावर वाहने व भाविकांची मोठी गर्दी होती.

1:चौकट या पालख्यांची भेट झाली :=  १हुन्नुरचा बिरोबा, २ सोन्याळचा विठोबा,३ उटगीचा ब्रम्हदेव, ४ जिराअंकलगीचा बिर्राप्पा ,५ शिराढोणची शिलवंती,६ हुलजंतीचा महालिंगराया,७ शिराढोणचा बिरोबा आणि नव्याने दाखल झालेली पालखी महालिंगरायाचा नातू कसगी येथील बगलीसिध्द. .

2 चौकट – अशी झाली भाकणूक :-
पोर्णिमेच्या आत पाऊस पडणार , गहू  व मिरची महागणार  हरभरा तुर बंदा रुपया  होणार, पेरणी झालेल्या ज्वारीचे पीक चांगल्या प्रकारे येणार,शेळ्या मेंड्या बैल यांची संख्या कमी होणार,  भाकणूक यावेळी पूजर्‍यांची सांगितली.

Pages