मराठा समाज आरक्षण मिळवून देणाऱ्या भाजप-सेनेशी गद्दारी करणार नाही:- नागेश भोसले - Divyaprabhat News

Breaking News

Thursday, October 17, 2019

मराठा समाज आरक्षण मिळवून देणाऱ्या भाजप-सेनेशी गद्दारी करणार नाही:- नागेश भोसले


परिचारक यांचे प्रचारार्थ सभा...

पंढरपुर/प्रतिनिधी 
           अनेक वर्षापासून मागणी असलेले मराठा समाजाला आरक्षण भाजपा व शिवसेनेने दिले असून ते न्यायालयात देखील टिकले आहे. यामुळे मराठा समाज सरकारशी गद्दारी करणार नसल्याची ग्वाही माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांनी केले. पुढे बोलताना भोसले यांनी सुधाकरपंत परिचारक २०,००० मतांनी निवडून येतील असा दावा केला.पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील भाजप शिवसेना मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार सुधाकर परिचारक यांच्या प्रचारार्थ गोविंदपूरा थोरात चौक येथील आयोजित काॅर्नर सभेत ते बोलत होते यावेळी नगराध्यशा साधना भोसले, लक्ष्मण शिरसट पापरकर, अनिल अभंगराव, प्रशांत लोंढे, दिपक वाडदेकर, रमेश कांबळे, दत्ता रजपूत, रवी मुळे, शिरीष कटेकर, डाॅ.प्राजक्ता बेणारे शकुंतला नडगीरे यांचे भाषणे झाली. याभागातील नाना करकमकर, प्रदिप धोरत, विक्रम शिरसट, माऊली बोराटे त्यांच्यासह मान्यवर गोविंदपुरा भागातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
          पुढे बोलताना नागेश भोसले यांनी, मराठा समाजासाठीचे आरक्षण ब्रिटीश काळापासून प्रलंबित होते. तो प्रश्न भाजपा शिवसेना युती सरकार सोडविला असून कोर्टात टिकणारे आरक्षण दिले आहे. सध्या निवडणुकीच्या काळात सोशल मिडीयावर मराठा आरक्षण रद्द झाल्याची अफवा पसरविण्यात येत आहे. अशा भूल थापांना बळी पडू नये असे आवाहन केले. आरक्षनामुळे आज हजारो मराठा तरुणांना नोकरी लागली असून शैक्षणिक सवलती मिळाल्या आहेत. यामुळे मराठा समाज भाजपा-सेना युतीशी गद्दारी करणार नाही. असे सांगून पंढरपूरातील मराठा समाजास काही अडचण आल्यास में हू ना....म्हणत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या स्टाईलमध्ये काॅलर उडवली व सुधाकरपंत परिचारकांना भरघोस मतदान करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले 
यावेळी महष्री वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शरद पवार यांनी आमच्या समाजाला उघड्यावर आणले. आमच्या समाजाचे हजारो लोकांना दाखल्यापासून वंचित ठेवले. या राष्ट्रवादी पक्षांकडून कोळी बांधवावर वारंवार अन्याय होत आला आहे त्यामुळे येत्या काळात आमचा कोळी समाज बांधव कधीच आघाडी सरकारला मतदान करणार नाही असे जाहिर केले.
         यावेळी याभागातील भीमज्योती तरुण मंडळाचे प्रशांत लोंढें यांनी येत्या काळात परिचारक यांच्या माध्यमातून तरुणांना शासकीय योजना, उच्च शिक्षण, नोकरी, बँकेच्या माध्यमातून उद्योग धंद्याला मदत होणार आहे. प्रशांत परिचारक यांचा दुरदृष्टीपणा व प्रचंड अभ्यास या बाबींचा जास्तीत जास्त फायदा होईल. त्यामुळे विरोधकांच्या कसल्याही भुलथापांवर विश्वास ठेउ नका असे मत व्यक्त केले. 

Pages