गेली पाच वर्षे सत्तेत असणाऱ्या आ.परिचारकांनी 35 गाव पाणी प्रश्नांसाठी काय दिवे लावले :- आ.भारत भालके..... - Divyaprabhat News

Breaking News

Thursday, October 17, 2019

गेली पाच वर्षे सत्तेत असणाऱ्या आ.परिचारकांनी 35 गाव पाणी प्रश्नांसाठी काय दिवे लावले :- आ.भारत भालके..... मंगळवेढा/प्रतिनिधी

       35 गावच्या पाणीप्रश्नाशी आपला काही संबध नाही आम्ही काय आश्वासन दिले नव्हते त्यामुळे ज्यांनी आश्वासन दिले त्यांच्याकडून सोडवणूक करा असे सांगून येथील जनतेची फसवणूक करून  मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या जवळचे म्हणून मिरवणाऱ्या आ.परिचारकांनी गेली पाच वर्षे सत्तेत असताना या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक आडकाठी आणली व तेच आता पाणीप्रश्न सोडवण्याची भाषा करीत असून जनतेने त्यांना याचा जाब विचारला पाहिजे  व सत्तेतून पैसा व पैसातून सत्ता मिळणाऱ्या परिचारकांना येथील स्वाभिमानी जनता त्यांची जागा त्यांना दाखवल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन आ.भारत भालके यांनी गोनेवाडी ,अंधळगाव येथील प्रचारसभेत व्यक्त केले
         आ.भालके म्हणाले की 2014 ला फडवणीस यांनी परिचारकांच्या प्रचारावेळी 35 गावचा पाणी प्रश्न सरकार आल्यावर सोडवतो असे सांगितले परंतु गेल्या पाच वर्षात आपण विधिमंडळात व बाहेर सातत्याने आवाज उठवून ही सरकारने निधी देण्यास टाळाटाळ केली परिचरकांनी मात्र या योजनेची वेळोवेळी टिंगल करून निधी कसा मिळणार नाही याची काळजी घेऊन येथील जनतेला फसविण्याचे काम केले  व तेच आता मी पाणी आणतो म्हणून गळा काढून खोटी
आश्वासने देत फिरत आहेत ज्यांना चार वर्षे  निलंबनामुळे विधानपरिषदेत जाता आले नाही ज्यांच्या चुलत्याने 25 वर्षात विधानसभेत केवळ दोन प्रश्न विचारले ते विकासकामे केली असल्याचे खोटे सांगत असून त्यांनी कामे केली असती तर प्रचारासाठी एवढी पळापळ करायची गरज लागली नसती त्यांनी जनतेसाठी काही केले नसून सत्तेतून पैसे व पैसातून सत्ता मिळवण्याचा उद्योग केला आहे सध्या पैसाच्या जोरावर माणसे फोडण्याचा त्यांचा एककलमी कार्यक्रम सुरू असला तरी मी पैसापेक्षा माणसे कमावली असल्याने सर्वसामान्य माणसे माझ्या सोबत आहेत जिल्हा जरी माझ्याविरोधात गेला तरी येथील स्वाभिमानी जनता माझ्या विजयाची हॅटट्रिक करणार आहे या सरकारला तोंडाला पावडर लावलेली  माणसे चालतात पण दुष्काळात तोंड करपलेली चालत नाहीत.
               फसव्या कर्जमाफीच्या माध्यमातून व दुधाचे दर कमी करून शेतकय्राचे कंबरडे मोडले शेतकऱ्यांना नियम व निकष लावणारे सरकार उलथून टाका.परिचारकांनी जातीय समीकरणातून मतांची फूट होण्यासाठी धनगर,लिंगायत,उमेदवार देण्याचा प्रयत्न केला ते शक्य झाले नाही म्हणून फोडाफोडी करून मराठा समाजात विभागणी करण्याचा प्रयत्न केला आहे माझ्या कार्यकाळात राज्यातील मी एकमेव आमदार असेल ज्याने 38 कोटी रुपये चा निधी ब वर्ग तीर्थक्षेत्रासाठी आणला लोक म्हणतात तुम्ही पक्ष बदलला आहे मात्र मोठ्या भावाकडून धाकट्या भावाकडे आलोय मात्र माझ्या विरोधात उभे असलेल्या परिचारिकांनी किती पक्ष बदलले हे जाहीर करावे व 25 वर्षात सभागृहात किती जनहीताचे प्रश्न मांडले याचे आत्मपरिक्षण करावे  सैनिकाविषयी अपशब्द वापरणार्यांना त्यांची जागा दाखवा 70 हजार कोटीची कर्जमाफ़ी देणाऱ्या पवार साहेबां विषयी बोलताना विरोधकांनी जनाची नाही मनाची ठेवा असा इशारा त्यांनी  दिला मतदारसंघात वीस वर्ष आमदारकी भोगलेल्या शिकलेल्या आमदाराने कधी येथील पाणीप्रश्नांकडे  लक्ष दिले नाही, संत चोखोबाकडे पाहिले नाही मात्र विशेष बाब म्हणून स्थापन केलेल्या ग्रामपंचायतीला मी चोखोबाचे नाव दिले।                 बसवेश्वर व चोखोबांच्या स्मारकासाठी आवाज उठविला.असून येणाऱ्या काळात रखडलेल्या योजना मार्गी लावण्यासाठी शेतकऱ्यांच्या मुलाला पुन्हा विधानसभेत पाठवा असे आवाहन केले 35 गावच्या उपसासिंचन योजनेसाठी निधी बाबत कधी ब्र शब्द काढला नाही की कधी पाठपुरवा केला नाही मुख्यमंत्री मंगळवेढा येथे येवुन देखील पाणी प्रश्नबाबत मूग गिळून गप्प बसले आणि आता पाणी आम्ही देणार आशा भूलथापा मारून येथील जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा उद्योग विरोधी मंडळी करीत आहेत तसेच स्वतःला संतांची पदवी घेऊन मिरवणार्या भाजपाच्या उमेदवाराला 25 वर्षे मंगळवेढ्यातील पाणीप्रश्न माहित नव्हता का असा सवाल करीत आपण पाणीप्रशना बाबत संवेदनशील असून मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी शेतकऱ्यांच्या मुलाला पुन्हा विधानसभेत पाठवण्याचे आवाहन आ.भारत भालके यांनी केले यावेळी लतीफ तांबोळी ,संभाजी गावकरे, परमेश्वर आवताडे,हर्षराज बिले,पांडूरंग चौगुले रामचंद्र मळगे,ईश्वर गडदे,काशीनाथ पाटील पांडूरंग भाकरे,महादेव माळी, सत्यवान लेंडवे संतोष शिंदे,ऋतुराज बिले,सिद्धेश्वर लेंडवे,पांडुरंग चौगुले, ईश्वर गडदे,शिवानंद पाटील,रामचंद्र लेंडवे,भाऊ डोंगरे, हिम्मत भाकरे,संतोष शिंदे,समाधान मोरे,अशोक लेंडवे,अँड.अर्जुन पवार,दादाबाला लेंडवे, आदी उपस्थित होते

Pages